Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Vicky Kaushal-Katrina Kaif यांनी अखेर आपल्या लेकाचं नाव केलं रिव्हील,

स्टार प्रवाहच्या ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेला सुरु होण्याआधीच ब्रेक; १२ ऐवजी

Bigg Boss Marathi 6 मध्ये होणार  राजकीय नेत्याची एन्ट्री? रितेश भाऊने दिली

सत्तरच्या दशकात Dev Anand यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली

Dharmaveer 2 मधील शिवरायांची ‘ती’ फ्रेम खास का आहे?

४००० कोटींच्या Ramayanaची धुरा ‘या’ मराठी माणसावर!

गौरव अमुलची काळजी कशी घेणार?; लवकरच Single Papa 2 प्रेक्षकांच्या

Hollywood मधून मराठीत रिमेक झालेले ‘हे’ चित्रपट माहिती आहेत का?

अखेर Shashank Ketkar ने स्क्रिन शॉट्ससह शेअर केलं 5 लाख

Border 2: ‘घर कब आओगे…’ तब्बल 28 वर्षांनंतर प्रसिद्ध गाणं

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Phule Hindi Movie: २५ एप्रिलला रुपेरी पडद्यावर येतोय ‘फुले’- एका युगप्रवर्तक परिवर्तनाचा प्रवास…

 Phule Hindi Movie: २५ एप्रिलला रुपेरी पडद्यावर येतोय ‘फुले’- एका युगप्रवर्तक परिवर्तनाचा प्रवास…
Fhule Hindi Movie
Press Release मिक्स मसाला

Phule Hindi Movie: २५ एप्रिलला रुपेरी पडद्यावर येतोय ‘फुले’- एका युगप्रवर्तक परिवर्तनाचा प्रवास…

by Team KalakrutiMedia 14/04/2025

Zee Studios प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित यांच्या माध्यमातून ‘ फुले‘ हा हिंदी चित्रपट जगभर येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी देशभर प्रदर्शित होत आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे कार्य या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या या क्रांतिकारी दाम्पत्याच्या प्रेरणादायी जीवनकहाणीला रूपेरी पडद्यावर मांडण्याचा हा प्रयत्न आहे, जो आजच्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देतानाच नव्या विचारांची दारे उघडणारा ठरणार आहे.(Fhule Hindi Movie)

Fhule Hindi Movie

‘फुले’ चित्रपटाचे निर्माते प्रणय चोक्शी, जगदीश पटेल, रितेश कुडेचा,अनुया चौहान कुडेचा, सुनील जैन आणि डॉ. राज खवारे असून, सहनिर्मितीची जबाबदारी क्रांती शानभाग, कलापी नागडा,रोहन गोडांबे, परीधी खंडेलवाल यांनी उचलली आहे.दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी या चित्रपटाचं प्रभावी दिग्दर्शन केलं आहे. ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत ‘स्कॅम १९९२’ फेम प्रतीक गांधी आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत अभिनेत्री पत्रलेखा झळकणार आहेत. त्यांच्या अभिनयातून या ऐतिहासिक व्यक्तिरेखांना नवी ऊर्जा मिळाल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होतं.

Fhule Hindi Movie
Fhule Hindi Movie

‘फुले‘ हा चित्रपट केवळ ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेत नाही, तर त्यामागची तत्त्वं, मूल्यं आणि सामाजिक चळवळींचं महत्त्व अधोरेखित करतो. त्यामुळे तो केवळ चित्रपट न राहता, एक सांस्कृतिक आणि वैचारिक अनुभव ठरेल.या चित्रपटाच्या दृश्यात्मक आणि तांत्रिक मांडणीला सशक्त आकार देणाऱ्या क्रिएटिव्ह टीममध्ये अनेक अनुभवी कलाकार सहभागी आहेत. सिनेमॅटोग्राफर म्हणून सुनीता राडिया यांनी प्रभावी चित्रभाषा वापरली आहे. वेशभूषा डिझायनर अपर्णा शाह यांनी ब्रिटिशकालीन भारतातील वास्तव आणि फुल्यांच्या सामाजिक स्तराचे सूक्ष्म दर्शन घडवले आहे. प्रोडक्शन डिझायनर म्हणून संतोष फुटाणे यांनी काळाला साजेशी पार्श्वभूमी उभी केली असून, सिंक साऊंडची जबाबदारी राशी बुट्टे यांनी सांभाळली आहे.

==============================

हे देखील वाचा: India’s Got Latent Case Update: Ranveer Allahbadia आणि Apoorva Mukhija च्या अडचणीत होऊ शकते वाढ; सायबर पोलिसांकडून होऊ शकते कारवाई

=============================

‘फुले’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर एका युगपुरुषाच्या विचारांचा, संघर्षाचा आणि परिवर्तनाच्या प्रवासाचा साक्षीदार ठरणारा दस्तऐवज आहे. २५ एप्रिलपासून हा सिने-अनुभव सर्वांच्या भेटीला येतो आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Alexx O'Nell bollywood update Celebrity Entertainment Fhule Hindi Movie Jeet Raidutt Krisheka Patel Marathi Movie Patralekhaa Paul Pratik gandhi Richard Bhakti Klein Sushil Pandey Vishal Arjun Vishal Tiwari
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.