Aaj Kay Banvuya: ‘आज काय बनवू या…? ‘मधुरा स्पेशल’ लवकरच येणार भेटीला; आता चवदार पाककृतींची रंगत

Madhuri Dixit : ‘भूल भुलैया ३’नंतर माधुरी आणि तृप्ती डिमरी पुन्हा एकत्र दिसणार!
धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) कायमच तिच्या चाहत्यांना नवनव्या चित्रपट आणि त्यातील भूमिकांमुळे आश्चर्याचा धक्का देत असते. ‘भूल भूलैय्या ३’ (Bhool Bhulaiya 3) मध्ये ग्रे शेडमधील भूमिका पहिल्यांदाच साकारत प्रेक्षकांना चकित करणारी माधुरी पुन्हा एकदा तृप्ती डिमरी (Tripti Dimri) सोबत झळकणार आहे. तृप्ती आणि माधुरी सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित कॉमेडी ड्रामा चित्रपटात पुन्हा एकत्र येणार असून या चित्रपटाचं नाव ‘माँ बहन’ (Ma Behan) असं आहे. (Bollywood movies)
मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी ज्या ‘माँ बहन’ चित्रपटामध्ये दिसणार आहेत तो चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून पुढील महिन्यात मुंबईत त्याचे शूटिंग सुरू होणार आहे. (Netflix movies)

‘तुम्हारी सुलू’ आणि ‘जलसा’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे सुरेश त्रिवेणी ‘माँ बहन’ चित्रपटात कॉमेडी आणि ड्रामा यांचा तडका देणार आहेत. हा चित्रपट तीन पात्रांवर आधारित असून माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी आई आणि मुलीच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच, या चित्रपटात रवी किशन आणि धारणा दुर्गा असतील असंही म्हटलं जात आहे. (Entertainment news)

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, माधुरी दीक्षित म्हणाली होती की, “माझा पुढचा प्रोजेक्ट तिच्या प्रेक्षकांना चकित करेल. या वर्षी मी स्वतःला आव्हान देणार आहे. मी लवकरच माझ्या पुढच्या प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे. हे खूप वेगळे आणि आव्हानात्मक आहे, जे मी यापूर्वी कधीही केले नाही”. (Bollywood tadaka)
===============================
हे देखील वाचा: ‘प्रेम त्रिकोणा’ची गोष्ट, माधुरी दीक्षित हुकमी प्रेयसी
===============================
तसेच, तृप्ती डिमरी ‘माँ बहन’ चित्रपटाव्यतिरिक्त लवकरच ‘धडक २’ मध्येही दिसणार आहे. याशिवाय, विशाल भारद्वाजच्या ‘अर्जुन उस्तारा’मध्ये तृप्ती डिमरी शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. (Tripti Dimri movies)