Panchayat 2: फुलेरा गावात रंगणार निवडणूकीची रणधुमाळी; ‘पंचायत’चा टिझर रिलीज

Gram Chikitsalaya Trailer: ‘ग्राम चिकित्सालय’ चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित; Vinay Pathak आणि Amol Parashar च्या जोडीने वाढवली उत्सुकता…
Gram Chikitsalaya Web Series: आपल्या गावकडचं आयुष्य आणि त्यावर आधारित चित्रपट किंवा सिरीज यामध्ये प्रेक्षक नेहमीच एक खास संबंध अनुभवतात. याचाचे परिणाम म्हणजे अलीकडे ग्रामीण पृष्ठभूमीवर तयार झालेल्या ‘पंचायत’ किंवा ‘दुपहिया’ यांना खूप यश मिळाले आणि प्रेक्षकांचा खूप प्रेम ही मिळाल. या दोन यशस्वी सिरीजनंतर आता ‘ग्राम चिकित्सालय’ ओटीटीवर आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहे. आणि नुकताच या सिरीजचा भन्नाट ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ‘ग्राम चिकित्सालय’ या सिरिजचा ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे. हा ट्रेलर प्राइम व्हिडिओने आपल्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. ट्रेलरमध्ये अमोल पराशर आणि विनय पाठक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दोघांनी डॉक्टरांची भूमिका साकारली आहे. अमोल पराशर सरकारी डॉक्टर बनले आहेत तर विनय पाठक एक घरगुती डॉक्टर बनले आहेत. या ट्रेलरवर प्रेक्षकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.(Gram Chikitsalaya Trailer)

‘ग्राम चिकित्सालय’चा निर्माण द वायरल फीवरच्या अंतर्गत दीपक कुमार मिश्रा यांनी केला आहे. या मालिकेची कथा वैभव सुमन आणि श्रेया श्रीवास्तव यांनी लिहिली आहे. तर, मालिकेचे संचालन राहुल पांडे यांनी केले आहे. निर्मात्यांनी अलीकडेच ‘ग्राम चिकित्सालय’चा ट्रेलर प्रदर्शित केला, ज्यामध्ये डॉ. प्रभात (अमोल पाराशर) यांच्या विखुरलेल्या पण सुंदर जगाची झलक दिसली. ट्रेलरमध्ये एक डॉक्टर, गावातील राजकारण, ग्रामीणांची शंका, औषधांची कमतरता यांच्यासह इतर समस्यांमध्ये अडकलेलापहायला मिळत आहे. सर्व समस्यांच्या दरम्यान डॉ. प्रभात गावकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी झुंजतो. तो आव्हानांना केवळ स्वीकारत नाही, तर त्यांना सोडवण्यासाठी नव्या-नव्या मार्गांचीही शोध घेतो.

साल 2020 मध्ये ग्रामीण जीवनावर आधारित ‘पंचायत‘ या मालिकेचा प्रवास सुरु झाला होता. आपल्या तीन शानदार टप्पे पूर्ण केलेल्या मालिकेचा 4 सीजन ही ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर 2 जुलै रोजी प्रीमियरसाठी तयार आहे, ज्यात प्रेक्षकांना आवडणाऱ्या पात्रांची आणि त्यांच्या जीवनाची कथा पाहण्याचा मजेदार प्रवास दिसेल. मे 2022 मध्ये त्याचा दुसरा सीजन आला. साल 2023 मध्ये ‘पंचायत’चा तिसरा सीजन आला आणि सर्वच हिट झाले. ग्रामीण भारताची पार्श्वभूमी असलेली हृदयस्पर्शी कॉमेडी आणि मनोरंजनाने भरलेली मालिकेचा सीजन 4 देखील निर्मात्यांनी जाहीर केला आहे. फुलेरा गावाचा सचिव जी आपल्या मंडळीसह प्रेक्षकांना मनोरंजनाचा पूर्ण डोज देण्यासाठी तयार आहेत. (Gram Chikitsalaya Trailer)
======================================
हे देखील वाचा: Ameesha Patel वयाच्या ४९ वर्षीही का आहे सिंगल? अभिनेत्रीने स्वतः सांगितले कारण म्हणाली…
=======================================
‘ग्राम चिकित्सालय’ ही सीरीज ही ‘पंचायत‘ सिरीज़च्या मेकर्सने तयार केली आहे. नुकतीच ‘ग्राम चिकित्सालय‘ च्या मेकर्सने याचा पोस्टर प्रसिद्ध केला होत. त्यात अमोल पराशर आणि विनय पाठक यांना दाखवण्यात आले होते. ‘ग्राम चिकित्सालय’ सिरीज़ 9 मे मध्ये रिलीज होणार आहे.‘ग्राम चिकित्सालय’ मध्ये अमोल पाराशर आणि विनय पाठकसोबत आकांक्षा रंजन कपूर, आकाश मखीजा, गरिमा विक्रांत सिंह आणि आनंदेश्वर द्विवेदी यांसारखे उत्कृष्ट कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.