Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prasad Oak : ‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

Last Stop Khanda Movie Poster: प्रत्येकाच्या प्रेमाची कहाणी सांगणारा ‘लास्ट स्टॉप खांदा’

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे ची

Nashibvan Marathi Serial: ‘रुद्र प्रताप घोरपडे’ च्या भूमिकेत आदिनाथ कोठारेची मालिका विश्वात पुन्हा एंट्री होणार?

Parineeti Chopra आणि राघव चढ्ढा यांच्या घरी येणार चिमुकला पाहुणा!

लहानग्या Hrithik Roshan याने डान्स करून जितेंद्रची छुट्टी करून टाकली

Bahubali To KGF; साऊथच्या हिट चित्रपटांना ‘या’ मराठी कलाकांनी दिला

Inspector Zende :  मराठमोळ्या पोलिसाचं कर्तृत्व मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या चित्रपटाचा

Akshay Kumar तब्बल १७ वर्षांनंतर ‘या’ अभिनेत्यासोबत चित्रपटात एकत्र झळकणार!

जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

PSI Arjun Trailer: राडा घालायचा येतोय ‘पी.एस.आय. अर्जुन; पहिल्यांदाच जेलमध्ये लाँच झाला मराठी चित्रपटाचा ट्रेलर…

 PSI Arjun Trailer: राडा घालायचा येतोय ‘पी.एस.आय. अर्जुन; पहिल्यांदाच जेलमध्ये लाँच झाला मराठी चित्रपटाचा ट्रेलर…
PSI Arjun Marathi Movie Trailer
मिक्स मसाला

PSI Arjun Trailer: राडा घालायचा येतोय ‘पी.एस.आय. अर्जुन; पहिल्यांदाच जेलमध्ये लाँच झाला मराठी चित्रपटाचा ट्रेलर…

by Team KalakrutiMedia 03/05/2025

PSI Arjun Trailer: बऱ्याच दिवसांपासून अंकुश चौधरीच्या वर्दीतील लुकची व डायलॉगची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. महाराष्ट्राचा ‘स्टाईल आयकॉन’ आणि ‘पॉवर परफॉर्मर’ अंकुश चौधरी ‘पी. एस. आय. अर्जुन’मध्ये फुल ॲक्शन रोलमध्ये दिसत आहे. चित्रपटाचे टीझर आणि गाणे आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस येत असून, प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच ‘पी.एस. आय. अर्जुन’ चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा अतिशय अनोख्या पद्धतीने पार पडला. यावेळी नवापूर पोलीस स्टेशनचे रिक्रिएशन करून जेलमध्ये हा सोहळा संपन्न झाला. (PSI Arjun Marathi Movie Trailer)

PSI Arjun Marathi Movie Trailer
PSI Arjun Marathi Movie Trailer

चित्रपटातील पोलीस अधिकारी बेड्या ठोकून अंकुश चौधरीला जेलमध्ये घेऊन आले. अंकुशची ही धमाकेदार एंट्री सर्वांनाच भावली. तसेच यावेळी चित्रपटातील प्रमोशनल सॉन्गही येथे सादर झाले. मराठीत इतक्या भव्यदिव्य आणि आगळ्यावेगळ्या स्वरूपात पार पडलेला हा बहुदा पहिला ट्रेलर लाँच सोहळा असावा. या ट्रेलर लाँचला चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. (PSI Arjun Marathi Movie Trailer)

PSI Arjun Marathi Movie Trailer
PSI Arjun Marathi Movie Trailer

ट्रेलरमध्ये अंकुश चौधरींची व्यक्तिरेखा संभ्रम निर्माण करणारी दिसत आहे. त्यामुळे तो नक्की चोर आहे की पोलीस, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. असे असले तरी अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतील डॅशिंग लूक, बिनधास्त ॲक्शन आणि कमाल डायलॉग्स प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत. ट्रेलर पाहून चित्रपटात अनेक रहस्ये असल्याचे दिसतेय. त्यामुळे या उत्कंठावर्धक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत, हे नक्की !

PSI Arjun Marathi Movie Trailer
PSI Arjun Marathi Movie Trailer

ट्रेलरबद्दल दिग्दर्शक भूषण पटेल म्हणतात, ‘’मराठी प्रेक्षक चोखंदळ असल्याने त्यांच्यासाठी एखादा जबरदस्त चित्रपट घेऊन येण्याची खूप इच्छा होती. पीएसआय अर्जुन एक असा चित्रपट आहे, ज्यात ॲक्शन, सस्पेन्स, रोमान्स असे सगळेच आहे. त्यामुळे फॅमिलीसाठी हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे. माझ्या पहिल्याच चित्रपटात अंकुश चौधरीसारखा अभिनेता आम्हाला लाभला. इतके नामवंत कलाकार आमच्या या चित्रपटात सहभागी झाले, यातच सर्व काही आले. ट्रेलरवरून प्रेक्षकांना चित्रपटाचा अंदाज आला असलेच. आम्ही प्रेमाने आणि मेहनतीने हा चित्रपट बनवला आहे. आता ९ मेपासून आम्ही तो प्रेक्षकांच्या स्वाधीन करणार आहोत. मला खात्री आहे, प्रेक्षक ‘पी. एस. आय. अर्जुन’वर भरभरून प्रेम करतील.’’(PSI Arjun Marathi Movie Trailer)

==============================

हे देखील वाचा: Atali Batmi Fhutali: अभिनेते विजय निकम झाले ‘टायगर भाई’!

===============================

या चित्रपटात अंकुश चौधरीसह किशोर कदम, राजेंद्र शिसटकर, नंदू माधव, कमलाकर सातपुते आणि अक्षया हिंदळकर यांच्या प्रमुख आहेत. व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित ‘पी.एस.आय.अर्जुन’चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मे २०२५ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: akshya hindalkar Ankush Chaudhari Bhushan Patel Entertainment Marathi Movie marathi movie 2025 PSI Arjun Marathi Movie Trailer PSI Arjun Trailer
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.