‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Leena Bhagwat : “प्रेक्षकांविषयी आदर आहे पण…”
प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तसं पाहायला गेलं तर माध्यमांची कमतरता नाही आहे. मात्र, चित्रपट, ओटीटीच्या जगात आजही प्रेक्षकांना मराठी नाटक आपुलकीचं वाटतं. नाटकाचा आजही राखीव प्रेक्षकवर्ग आहे. नाटकाचा प्रयोग सुरु असताना काही प्रेक्षक मनापासून शांत राहून दाद देत असतात तर काही उगाच काहीतरी चुळबूळ करुन इतरांचं आणि कलाकारांचं लक्ष विचलित करण्याची काम करत असतात. यावरच आक्षेप घेत अभिनेत्री लीना भागवत यांनी महत्वाचं विधान केलं आहे. (Entertainment news)

लीना यांनी आरपारला दिलेल्या मुलाखतीमध्ये नाटकात वाजणाऱ्या मोबाइल फोनबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या की,“काही प्रेक्षक नाटक सुरू झाल्यानंतरही मोबाईल वापरतात. पण याला काही करु शकत नाही. हा हतबलतेचा त्रास आहे. म्हणजे मला भीती वाटते की, जेव्हा ब्लॅक-आऊट होतो तेव्हा एखादा लाइट दिसतो. मोबाईमध्ये कोणीतरी काहीतरी चेक करत असतं किंवा नाटक संपल्या संपल्या आम्ही (कलाकार) रंगमंचावरुन जायच्या आधी प्रेक्षक ‘एक फोटो हवा आहे’ म्हणून येतात. प्रेक्षकांविषयी मला खूप आदर आहे; पण मी हे बोलतेय.” (Entertainment dhamaka)

पुढे लीना भागवत म्हणाल्या की, “मला असं वाटतं की, माझ्या सादरीकरणात इतकी त्रुटी आहे का? की मी नाटक संपल्यानंतर मी प्रेक्षकांना एक मिनिटही खिळवून ठेवले शकले नाही. मी आता इतकं कुचकं काम केलं का? की लोक तिथे थांबून राहिले नाही. मी हे आता काय बघितलं असं लोकांना वाटलं नाही. मी म्हटलं तसं मायबाप रसिक, आई-वडील आहात तुम्ही. पण मग आई-वडील ही चुकतात की… पण मग आई नको ना गं करु असं सांगितल्यावर आई नाही रागवत, मग त्यांनी आमच्यावर का रागवावं? खरंच थांबा ना… दोन मिनिटे तरी थांबा… तुमचे फोन नको वाजूदेत.”(Entertainment)
===========================
हे देखील वाचा:अशोक सराफ…. एक आदर्शवत कलाकार!
===========================
मराठी नाटकांसह चित्रपट आणि मालिकाविश्वातही लीना भगवत यांनी कामं केली आहेत. पण अधिक त्या नाटकातच रमल्या. लीना यांनी ‘गोष्ट तशी गमतीची’, ‘अधांतर’, ‘चल तुझी सीट पक्की’, ‘वैशाली कॉटेज’ यांसारख्या अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. रंगभूमीवर सध्या त्यांचं ‘आमने सामने’ हे नाटक सुरू आहे. या नाटकांशिवाय त्यांनी ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे.(Leena bhagwrathi ays)at