
“ जग तुम्हाला ओळखू….” शाहरुख सोबत Met Gala 2025 मध्ये घडलेल्या प्रसंगावर Sai Tamhankarची प्रतिक्रिया!
मराठीसह बॉलिवूड गाजवणारी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) तिच्या बोल्ड लूकप्रमाणेच बोल्ड स्टेटमेंट्ससाठीही प्रसिद्ध आहे. आपली मतं ठामपमे मांडणाऱ्या या अभिनेत्रीने नुकतंच शाहरुख खानसोबत मेट गाला २०२५ मध्ये (Met Gala 2025) घडलेल्या एका घटनेवर भाष्य केलं आहे. ग्लोबली ज्या शाहरुख खानची (Shah rukh khan) चर्चा आहे अशा किंग खानला मेट गाला मध्ये आंतरराष्ट्रीय मिडिया ओळखू शकली नव्हती. याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यावर आता सई ताम्हणकर हिने सगळं जग तुम्हाला ओळखू शकेल असं नाही असं म्हणत स्पष्टीकरण दिलं आहे.(Entertainment news)

Met Gala 2025 मध्ये शाहरुख खानला न ओळखल्यामुळे आंतरराष्ट्रीय मीडियाला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. यावर बोलताना सई म्हणाली की, ‘हे जे ट्रोलिंग झाले ते प्रेमापोटी झालं आहे. शाहरुखला ओळखत नाही का? या आपल्या भावना आहेत. चाहत्यांच्या भावना मी समजू शकते. पण असं आहे की, मी उद्या असं नाही बोलू शकत की मी माझी ओळख नाही करून देणार, तुम्ही मला ओळखायला पाहिजे. असं नाही होऊ शकत. संपूर्ण जग तुम्हाला नाही ओळखू शकत. कुठेतरी कोणीतरी असेल ज्याला माहीत नसेल की तुम्ही नेमके कोण आहात आणि ते ठीक आहे. मी या प्रसंगाकडे अशा दृष्टीने बघते.’ (Bollywood news)

तर, आंतरराष्ट्रीय मीडियाला शाहरुख खानने (Shah Rukh Khan) स्वत:ची ओळख ‘मी शाहरुख’ अशी करुन दिली. त्याविषयी सई म्हणाली की, ‘म्हणूनच तो शाहरुख खान आहे.’ Met Gala मधून शाहरुखचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात, शाहरुख खान एका मीडियाला त्याचे नाव सांगताना दिसला. तो म्हणतो की, ‘हाय, आय एम शाहरुख.’ यावरून चाहत्यांनी मीडियाला खूप ट्रोल केले होते की, इतक्या मोठ्या स्टारला कसे ओळखले नाही, पण त्यावेळीही SRK शांत होता आणि त्याने कोणतीही अडचण न दाखवता आपली ओळख करून दिली”.(Met Gala 2025)
================================
हे देखील वाचा: War 2 : दमदार अॅक्शन आणि कसदार अभिनय; ह्रतिक-Jr NTRच्या चित्रपटाचा टीझर रिलीज
=================================
खरं तर शाहरुख खानला (Shah Rukh Khan) जगात कुणी ओळखत नसेल हे नवलच पण तरीही मेट गाला २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय मिडिया किंग खानला ओळखत नाही हे जरा अनपेक्षितच आहे. मात्र, तरीही भारताचं प्रतिनिधित्व करताना नम्रपणे शाहरुख खानने त्याची मीडियाला करुन दिलेली ओळख पुन्हा एकदा चाहत्यांचं मन जिंकून गेली असं नक्कीच म्हणावं लागेल. दरम्यान, लवकरच शाहरुख खान Pathan Vs Tiger या चित्रपटात दिसणार असून बऱ्याच वर्षांनंतर शाहरुख आणि सलमान (Salman Khan) एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. (Bollywood spy movies)