टॉम क्रुझच्या Mission Impossible : The Final Reckoning चित्रपटाची भारतात

Hera Pheri 3 : राजूने पाठवली बाबू भैय्याना २५ कोटींची नोटीस!
काही दिवसांपासून बाबू भैय्या अर्थात अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) विशेष चर्चेत आहेत. बॉलिवूडमधील कल्ट चित्रपट हेरा फेरी चित्रपटाचा ते महत्वाचा भाग असून त्यांनी साकारलेली बाबू भैय्या ही भूमिका २५ वर्षांनी देखील तितकीच ताजी तवाणी वाटते. ‘हेरा फेरी’ चित्रपटाच्या दोन्ही भागांना मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता लवकरच ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3) येणार असल्याची घोषणा दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी केली होती. मात्र, आता परेश रावल यांनी अचानक ‘हेरा फेरी’ मधून एक्झिट घेतली असून आता यामुळेच अक्षय कुमारने (Akshay Kuamr) परेश रावल यांना कोर्टाची नोटीस धाडली आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात…(Bollywood news)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी परेश रावल यांनी एका मुलाखतीमध्ये आता मी ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाचा भाग नाही आहे असं स्पष्टपणे सांगितलं होतं. मेकर्स किंवा दिग्दर्शक प्रियदर्शन (Priyadarshan) यांच्यासोबत कुठलेच वैचारिक वाद नसल्याची कबूली देखील त्यांनी दिली होती. मात्र, आता अक्षय कुमारच्या केप ऑफ गुड फिल्म्स या निर्मिती संस्थेने परेश रावल यांना २५ कोटींची नोटीस पाठवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हेरा फेरी ३ चित्रपटासाठी परेश रावल यांना तिप्पट मानधन देण्यात आलं आहे. (Entertainment tadaka)
दरम्यान, यापूर्वीही अक्षय कुमार सोबतच्या एका चित्रपटातून परेश रावल यांनी अशीच माघार घेतली होती. २०१२ मध्ये आलेल्या ‘ओह माय गॉड’ (OMG movie) या चित्रपटाला प्रचंड यश मिळालं होतं. परेश रावल आणि अक्षय कुमारची जोडी पुन्हा एकदा हिट ठरली होती आणि त्याचमुळे चित्रपटाचा सीक्वेल ‘ओह माय गॉड २’ (OMG 2) आला होता. मात्र, त्यावेळी कथानक न आवडल्यामुळे परेश यांनी माघार घेतली होती आणि त्यांच्याऐवजी पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) चित्रपटात दिसले होते. (Bollywood masala)
===============================
हे देखील वाचा: YouTube : नेटफ्लिक्स अन् प्राइमशी स्पर्धा करण्यासाठी YouTubeचा नवा अवतार येणार
===============================
‘हेरा फेरी ३’ मधून परेश रावल यांनी माघार घेतल्याच्या निर्णयावर दिग्दर्शक प्रियदर्शन यांची प्रतिक्रिया आली आहे. प्रियदर्शन म्हणाले की, “मला माहीत नाही की, असं का झालं? कारण- परेशनं याबाबत आम्हाला पूर्वकल्पना दिली नव्हती. चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी अक्षय कुमारनं मला सुनील शेट्टी व परेश रावल दोघेही काम करण्यास तयार आहेत का याबाबत एकदा त्यांना पुन्हा विचार, असं सांगितलं होतं आणि तेव्हा दोघांकडूनही होकार आला होता.” आता मात्र, बाबू भैय्याच्या एक्झिटमुळे ‘हेरा फेरी ३’ चित्रपट येणार का? आणि आला तरी बाबू भैय्या कोण असणार? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. (Hera pheri 3 news)