‘पाठक बाई’ देणार गुड न्यूज? Akshaya Deodhar च्या व्हिडिओवरुन प्रेग्नंसीच्या

Kalam : मराठमोळा दिग्दर्शक उलगडणार ‘मिसाईल मॅन’चं जीवनचरित्र!
ऐतिहासिक, विनोदी, हॉरर अथवा थ्रिलर चित्रपटांच्या यादीत बायोपिक्स प्रेक्षकांना विशेष भावतात. लवकरच भारताचे ११वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार आहे. मराठमोळे दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) ‘कलाम’ (Kalam) हा चरित्रपट प्रेक्षकांच्या स्वाधीन करणार असून यात भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता मोठ्या पडद्यावर कलाम यांची भूमिका साकारणार आहे. (Bollywood news)

डॉ. कलाम हे भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. त्यांचा जीवन प्रवास ‘अग्निपंख’ अर्थात ‘Wings Of Fire’ या त्यांच्या आत्मचरित्रात मांडला आहे. आता रुपेरी पडद्यावर डॉ. कलाम यांचं जीवन दाक्षिणात्य सुपरस्टार धनुश (Dhanush) आपल्या अभिनयातून मांडणार आहे. ओम राऊत यांचं दिग्दर्शन असणाऱ्या या बायोपिकची निर्मिती भूषण कुमार, अभिषेक अग्रवाल आणि अनिल सुंकरा करणार आहेत.(Bollywood tadaka)
================================
=================================
खरं तर, ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या अपयशानंतर ओम राऊत काही काळ चित्रपटांपासून दूर झाले होते. मात्र, आता ‘कलाम‘ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांनी चित्रपटांकडे पाऊल वळवलं असून प्रेक्षकांची या चित्रपटाकडून विशेष अपेक्षा नक्कीच आहे. ओम राऊत यांनी चित्रपटाचा पोस्टर सोशल मिडियावर शेअर करत लिहिलं होतं की, “रामेश्वरपासून ते राष्ट्रपती भवनपर्यंत, महान व्यक्तीचा प्रवास सुरु होतोय…भारताचा मिसाईल मॅन रुपेरी पडद्यावर.. मोठी स्वप्न बघा..उंच उडा. कलाम-द मिसाईल मॅन ऑफ इंडिया.”(Entertainment)

येणाऱ्या काळात भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक बिग बजेट चित्रपट येणार आहेत. यात ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘राजा शिवाजी’, ‘कांतारा चॅप्टर १’, ‘वॉर २’, ‘कल्की २’ असे हिंदी आणि दाक्षिणात्य भाषेतील चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना विविध विषयांवर आणि आशयांवर आधारित चित्रपटांची मेजवानी नक्कीच मिळणार आहे.(Upcoming big budge Indian films)