Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

‘स्काय फोर्स’ ते ‘रेड २’ बॉलिवूडच्या चित्रपटांचं Box Office Collection!
चित्रपटप्रेमींना सध्या थिएटर असो किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म असो वेगवेगळ्या भाषांमधील कंटेन्ट पाहण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. केवळ नव्या धाटणीचेच नव्हे तर बॉलिवूडच्या इतिहासातील असे काही क्लासिक चित्रपट जे प्रेक्षकांनी आधी डोक्यावर घेतले होते ते रि-रिलीज (Re-Release movie trend) करण्याचा ट्रेण्डही इंडस्ट्रीने आणला. विशेष म्हणजे प्रेक्षकांनी रि-रिलीज चित्रपटांना नव्या चित्रपटांपेक्षा अधिक प्रतिसाद दिलेला देखील पाहायला मिळाला. जाणून घेऊयात जानेवारी ते मे पर्यंत रिलीज झालेल्या तुमच्या लाडक्या कलाकारांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे.(Bollywood news)

अलीकडे चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांना किती आवडलं किंवा चित्रपट किती आठवडे थिएटरमध्ये होता हे चित्रपटाच्या यशाचं मोजमाप करण्याचं प्रमाण बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याकडे वळलं आहे. बरं थिएटरमध्ये चित्रपट फार आठवडे चालला नाही तर त्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं ओटीटी हे वेगळं माध्यम उपलब्ध आहेच. त्यामुळे चित्रपटाचं एकूण बजेट थिएटर किंवा ओटीटीवर वसूल केलं जातंच. मात्र, या सगळ्यात चित्रपट प्रेक्षकांना किती आवडला याकडे मेकर्सच लक्षच जात नाही हे खरं तर दुर्दैव. ‘स्काय फोर्स’ (Skay Force) ते ‘जाट’ (Jaat) बॉलिवूडच्या सुपरस्टार्सने किती कोटींची कमाई केली जाणून घ्या..(Bollywood news update)

जानेवारी महिन्यात अक्षय कुमारची (Akshay kumar) प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘स्काय फोर्स’ चित्रपटाने २०२५ ची सुरुवात झाली. या चित्रपटाने १३४.९३ कोटी कमावले. त्यानंतर विकी कौशलच्या ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने ६१५.३९ कोटींची कमाई करत भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहासच रचला. मग आला सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांचा ‘सिकंदर’ चित्रपट. खरं तर हा चित्रपट ‘छावा’लाही मागे टाकेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता खरा पण तो काही अंशी चुकला. ‘सिकंदर’ने केवळ १२९.९५ कोटींची मजल मारली. मग आला सनी देओल याचा ‘जाट’ (Jaat) चित्रपट ज्याने ९०.३२ कोटींची कमाई केली. पुढे अक्षय कुमार, आर माधवन आणि अनन्या पांडे यांचा ‘केसरी २’ (Kesari 2) आला आणि अनपेक्षितपणे या चित्रपटाने ‘जाट’ चित्रपटाला मागे टाकत ९२.६७ कोटींची कमाई केली. तर सलमान खान, अक्षय कुमार आणि सनी देओल या तिनही सुपरस्टार कलाकारांना मागे टाकत अजय देवगण आणि रितेश देशमुखच्या ‘रेड २’ (Raid 2) चित्रपटाने १५५.४ कोटींची कमाई केली. (Bollywood movies box office collection 2025)
================================
हे देखील वाचा: Supriya : चमेलीच्या भूमिकेत सुप्रिया नाही तर पल्लवी जोशी असत्या?; काय आहे किस्सा…
=================================
दरम्यान, बॉलिवूडमध्ये आगामी काळात बरेच सीक्वेल्स आणि बिग बजेट चित्रपट येणार आहेत. ‘दे दे प्यार दे २’, ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5), ‘राजा शिवाजी’ 9Raja Shivaji), ‘वॉर २’ (War 2), ‘धडक २’, ‘जॉली एल.एल.बी ३’, ‘बागी ४’, ‘अॅनिमल पार्क’, अशी मोठी यादी आहे. आता आगामी काळात हे चित्रपट किती कमाई करतात आणि सोबतच प्रेक्षकांचं किती मन जिंकतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.(Upcoming Bollywood films 2025)