Housefull 5 OTT: थिएटर्सनंतर आता ओटीटीवर झळकणार ‘हाउसफुल 5’; जाणून घ्या, कधी आणि कुठे

Preity Zinta : भारतीय सैन्याच्या कुटुंबियांना डिंपल गर्लने केली विशेष मदत!
बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ प्रिती झिंटा (Preity Zinta) पुन्हा एकदा चित्रपटांकडे बऱ्याच वर्षींनी वळली आहे. मध्यंतरीच्या काळात केवल आयपीएल आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणाऱ्या प्रितीने नुकतंच तिच्या एका कृत्यामुळे चाहत्यांचं मन जिंकलं आहे. भारतीय सैन्याविषयी आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल प्रत्येक भारतीयांना प्रेम आणि आदर असतोच. आता प्रिती झिंटानेही सैन्याची विशेष मदत करत कौतुकास्पद कामगिरी केली आहे.(Entertainment update)

अभिनेत्री प्रिती झिंटा हिने भारतीय सैनिकांच्या विधवा पत्नी आणि त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी तब्बल १.१० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तिने ही देणगी दक्षिण-पश्चिम कमांडच्या ‘आर्मी वाइव्ज वेल्फेअर असोसिएशन’ (AWWA) ला देऊ केली असून ही देणगी आयपीएल संघ पंजाब किंग्जच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत देण्यात आली आहे.

नुकत्याच जयपूरमध्ये झालेल्या एका विशेष कार्यक्रमाला प्रितीने हजेरी लावली होती. यावेळी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक सैन्य कुटुंबीय उपस्थित होते. प्रितीने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, “सैनिकांच्या कुटुंबांना मदत करणे हे केवळ सन्मान नाही तर जबाबदारीही आहे. आपल्या जवानांच्या बलिदानाची परतफेड कधीच शक्य नाही, पण त्यांच्या कुटुंबांच्या पाठीशी उभं राहणं आपली जबाबदारी आहे. आम्ही भारतीय सैन्याच्या शौर्यावर अत्यंत अभिमान बाळगतो आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत”. (Bollywood news)
================================
हे देखील वाचा: Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून लांब का गेली?
=================================
महत्वाची बाब म्हणजे प्रिती झिंटा (Preity Zinta) स्वत: एका सैन्य कुटुंबातून येते. तिचे वडिल दुर्गानंद झिंटा हे भारतीय सैन्यात मेजर पदावर कार्यरत होते. यामुळे तिला देशाप्रती आणि विशेषतः सैन्याप्रती खूप प्रेम आहे. दरम्यान, लवकरच प्रिती झिंटा ‘लाहौर १९४७’ (Lahore 1947 movie) या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात सनी देओल (Sunny deol) आणि आमिर खान (Amir Khan) यांच्यासोबत ती झळकणार आहे. भारत-पाकिस्तान फाळणीवर या चित्रपटाचं कथानक आधारित असून लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Preity Zinta movies)