Housefull 5 OTT: थिएटर्सनंतर आता ओटीटीवर झळकणार ‘हाउसफुल 5’; जाणून घ्या, कधी आणि कुठे

Ambat Shaukin Movie : पूजा सावंत आणि प्रार्थना बेहरेच्या‘आंबट शौकीन’चा ट्रेलर प्रदर्शित
तीन अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी सांगणाऱ्या ‘आंबट शौकीन’ (Ambat Shaukin) चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये ललित, वरूण आणि रेड्डी हे तीन खट्याळ मित्र दिसत असून ते हसवण्यासोबत विचार करायलाही भाग पाडत आहेत. प्रेम, मैत्री, सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत हरवलेली ओळख व मानसिक गुंतागुंत असणाऱ्या या तिघांच्या आंबटपणामुळे त्यांच्या आयुष्यात काय वादळ येणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.(Ambat Shaukin Movie Trailer)

नुकताच या सिनेमाचा भन्नाट टीझर ही प्रदर्शित झाला होता आणि प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिकच उधाण आले होते. टीझरमधूनच धमाल कॉमेडी, जबरदस्त पंचेस आणि रंगतदार दृश्यांची झलक पाहायला मिळत असून हा चित्रपट एका धमाकेदार प्रवासाची सुरुवात आहे, असे म्हणायला हरकत नाही. तीन अवलिया मित्रांची कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या खट्याळ, अतरंगी मित्रांची मुली पटवण्यासाठी चाललेली धडपड या चित्रपटात पाहायला मिळेल. (Ambat Shaukin Movie Trailer)
================================
================================
‘आंबट शौकीन’ चे दिग्दर्शन निखिल वैरागर यांनी केले आहे. येत्या १३ जून २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटात पूजा सावंत, अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, किरण गायकवाड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय संत, राहुल मगदूम यांच्यासह अनेक मातब्बर कलाकार झळकणार आहेत.