
Samsara Marathi Movie : जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान घडणारी गूढरम्य उलगडणार!
हॉरर चित्रपट हा जगभरात लोकप्रिय असलेला प्रकार आहे. मात्र मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर प्रकार फार हाताळला गेलेला नाही. ही उणीव “समसारा” हा चित्रपट भरून काढणार असून, दमदार स्टारकास्ट या चित्रपटाचा गूढरम्य टीजर लाँच नुकताच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे. जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान घडणारी गुढकथा यातून उलगडणार आहे. (Samsara Marathi Movie Teaser)

जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान घडणारी एक गूढरम्य गोष्ट “समसारा” चित्रपट उलगणार असूनगूढरम्य गोष्टीला अनुभवी अभिनेत्यांची साथ लाभली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सागर लढे यांनी सांभाळली आहे. चित्रपटात सायली संजीव, ऋषी सक्सेना, पुष्कर श्रोत्री, डॉ गिरीश ओक, नंदिता धुरी, प्रियदर्शनी इंदलकर, तनिष्का विशे, यशराज डिंबळे, कैलास वाघमारे, साक्षी गांधी अशी उत्तम स्टारकास्ट झळकणार आहे.

=======================================
=======================================
मराठी चित्रपटांत हॉरर प्रकार फारसा हाताळला गेला नसल्यानं ‘समसारा’ एक वेगळा प्रयोग ठरणार आहे. चित्रपटाच्या टीजरमुळे चित्रपटाविषयी चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे. त्यामुळेच समसाराचं नेमकं गूढ काय आहे, या विषयी आता कुतूहल निर्माण झालं आहे. मात्र, त्यासाठी २० जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi | Marathi Entertainment News