
“Jackie Chan अजय देवगणला म्हणाले तु अॅक्शन सीन्स कर आणि मी…”
९०च्या दशकातील असे कुणीच नसतील ज्यांना जॅकी चॅन (Jackie Chan) माहित नसेल. काहींनी तर त्यांचे कराटेचे चित्रपट पाहून कराटे शिकायची जिद्द पालकांकडे केली असेल. आता लवकरच कराटे जागतिक स्तरावर दिसणार असून ‘कराटे किड लेजेंड्स’ (Karate Kids : Legends) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष बाब अजय देवगणचा (Ajay Devgan) मुलगा युग देवगण या चित्रपटाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातील एका पात्राला आवाज देणार असून अजय देवगणने खुद्द जॅकी चॅन यांच्या पात्राला आवाज दिला आहे. आणि आता थेट जॅकी चॅन यांनी अजय सोबत स्क्रिन शेअर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.(Bollywod masala)

नुकताच अजय देवगण आणि जॅकी चॅन यांचा एक व्हिडीओ ‘सोनी पिक्चर्स इंडिया’ने सोशल मिडियावर शेअर केला असून यात जॅकी चॅन आणि अजय देवगण यांच्यात बातचीत सुरु असल्याचं दिसतं. अजय देवगण जॅकी यांना म्हणतो की, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. यावर जॅकी अजयला म्हणतात की मला भारतात बोलाव, आणि असं म्हणतच जॅकी चॅन यांनी अजयबरोबर बॉलीवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली.(Entertainment news)
यावर, अजय देवगण जॅकी चॅन यांना म्हणतो की, तुमच्याबरोबर काम करायला नक्की आवडेल. यावर तु अॅक्शन सीन कर मी डान्स करतो असं जॅकी अजयला म्हणतात. पुढे व्हिडिओत जॅकी चॅन ‘कुंग फू योगा’ चित्रपटातील डान्स स्टेप्स करून दाखवताना दिसले. त्यामुळे येत्या काळात जॅकी चॅन बॉलिवूडमध्ये त्यांच्या डेब्यु करतील अशी आथा काही अंशी खात्री पटू लागली आहे. (Bollywood tadaka)

अजय देवगण आणि त्याचा मुलगा युग (Yug Devgan) हे दोघेही ‘कराटे किड: लेजेंड्स’ या चित्रपटातील दोन पात्रांना आवाज देणार आहेत. अजय जॅकी चॅन यांनी साकारलेल्या मिस्टर हान या पात्राला तर युग बेन वांग यांनी साकारलेल्या चित्रपटातील मुख्य पात्र ली फोंगला आवाज देणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी अजय देवगण पहिल्यांदाच व्हॉइसओव्हर देणार असून त्याचा हा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट आहे.(Ajay Devgan movies)
================================
हे देखील वाचा: Ajay Devgan : ‘अजय ते विजय साळगांवकर’;बॉलिवूडमध्ये 9 मराठी पात्र साकारणारा देवगण!
=================================
जोनाथन एंटविस्टल दिग्दर्शित ‘कराटे किड : लेजेंड्स’ हा भारतात ३० मे २०२५ रोजी प्रदर्शित होणारा एक अमेरिकन मार्शल आर्ट्स चित्रपट आहे. १९८४ मध्ये सुरू झालेल्या कराटे किड फ्रँचायजीमधील हा ६ वा चित्रपट आहे. त्यात जॅकी चॅन, बेन वांग, राल्फ मॅचियो, जोशुआ जॅक्सन, सॅडी स्टॅनली आणि इतर अनेक कलाकार मुख्य भूमिकांत आहेत. हा चित्रपट ३० मे रोजी भारतासह अमेरिका व कॅनडामध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतात हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमीळ व तेलुगू या भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे.(Karate Kids : Legends 2025 movie)