Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Drishyam 3: ठरलं ! अजय देवगन बनवणार ‘दृश्यम 3’, मोहनलाल ही आणणार तिसरा पार्ट; कोणाची जादू चालणार?

 Drishyam 3: ठरलं ! अजय देवगन बनवणार ‘दृश्यम 3’, मोहनलाल ही आणणार तिसरा पार्ट; कोणाची जादू चालणार?
Drishyam 3
मिक्स मसाला

Drishyam 3: ठरलं ! अजय देवगन बनवणार ‘दृश्यम 3’, मोहनलाल ही आणणार तिसरा पार्ट; कोणाची जादू चालणार?

by Team KalakrutiMedia 30/05/2025

Drushyam 3: 2025 च्या एप्रिल महिन्यात जेव्हा मोहनलाल यांनी त्यांच्या सुपरहिट क्राईम सस्पेन्स थ्रिलर फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाची म्हणजेच ‘दृश्यम 3’ ची घोषणा केली, तेव्हा बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. कारण ही मूळ मलयाळम फिल्म हिंदीसह पॅन इंडिया रिलीज होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. यामुळे बॉलिवूड अभिनेता अजय देवगनसाठी ही मोठी चिंता बनली होती, कारण त्यांनी देखील 2022 मध्ये आलेल्या ‘दृश्यम 2’ नंतर आपल्या ‘दृश्यम 3’ ची घोषणा आधीच केली होती. अशा परिस्थितीत, जेव्हा मूळ ‘दृश्यम 3’ चित्रपटच हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे, तेव्हा प्रेक्षक पुन्हा त्याच गोष्टीवर आधारित दुसरा हिंदी चित्रपट पाहतील का, हा मोठा प्रश्न होता.(Drishyam 3)

Drishyam 3
Drishyam 3

मात्र आता या सर्व शंका-कुशंका दूर होत आहेत कारण अजय देवगन यांची ‘दृश्यम 3’ अधिकृतपणे कन्फर्म झाली आहे. 29 मे 2025 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये सेबीच्या लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स च्या नियमांतर्गत पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेड ने डिजिटल 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत भागीदारी करत ही घोषणा केली आहे. चित्रपटात अजय देवगन पुन्हा एकदा विजय सालगावकर या भूमिकेत दिसणार आहेत, आणि दिग्दर्शन करणार आहेत. अभिषेक पाठक, ज्यांनी ‘दृश्यम 2’ सुद्धा दिग्दर्शित केला होता. येथे खरी गंमत म्हणजे मोहनलाल यांची ‘दृश्यम 3’ देखील एकाच वेळी मलयाळम आणि हिंदीत प्रदर्शित होणार आहे आणि विशेष म्हणजे दोन्ही चित्रपटांची कथा वेगळी असेल! एप्रिल 2025 मध्ये ‘मिड डे’च्या रिपोर्टनुसार, मोहनलालची टीम आधीच त्यांच्या स्क्रिप्टवर काम पूर्ण करून बसली आहे. दुसरीकडे अजय देवगनच्या टीमकडून हिंदी व्हर्जनसाठी स्क्रिप्ट तयार केली जात आहे.

Drishyam 3
Drishyam 3

ही स्पर्धा अजय देवगनसाठी सोपी नसेल. कारण त्यांना अशी कथा घ्यावी लागेल जी प्रेक्षकांना वेगळी वाटेल आणि ज्यात थ्रिलर, सस्पेन्स आणि एक नविन ट्विस्ट असेल. प्रेक्षक ‘दृश्यम’सारख्या चित्रपटांकडून आजही मोठ्या अपेक्षा ठेवतात. मोहनलाल यांची मूळ ‘दृश्यम’ (2013) आणि ‘दृश्यम 2’ (2021) ह्या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. त्यांच्या यशानंतर अजय देवगन यांनी 2015 मध्ये ‘दृश्यम’ चा हिंदी रिमेक केला आणि 2022 मध्ये ‘दृश्यम 2’ ला बॉक्स ऑफिसवर भरघोस प्रतिसाद मिळाला. दोन्ही व्हर्जन्समध्ये कथेचा आत्मा जरी सारखाच असला, तरी मांडणी आणि अभिनयाच्या जोरावर दोन्ही चित्रपटांनी आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं.(Drishyam 3)

=================================

हे देखील वाचा: The Traitors ची स्पर्धकांची अंतिम यादी आली समोर; २२ दिग्गज सेलिब्रिटी येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

=================================

आता दोन्ही स्टार्स मोहनलाल आणि अजय देवगन आपापल्या ‘दृश्यम 3’ ला हिंदी प्रेक्षकांपर्यंत घेऊन जाणार आहेत. यात कोणाची गोष्ट प्रेक्षकांना अधिक आवडेल? कोण जास्त प्रभाव टाकेल? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. एक मात्र नक्की ‘दृश्यम 3’ दोन्ही व्हर्जनमध्ये बॉक्स ऑफिस धमाका घडवून आणू शकते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor mohanlal ajay devagn Bollywood Celebrity drishyam 3 drishyam 3 release date Entertainment Marathi Movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.