Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Squid Game 3: पुन्हा फासे पलटणार; येणार नवा ट्विस्ट!
सध्या ओटीटीवरील कोरियन वेब सीरीज किंवा चित्रपट फारच ट्रेंण्डींग आहेत. लोकांना अक्षरश: भंडावून सोडणारी ‘स्क्विड गेम’ ही वेब सीरीज आता लवकरच तिसरा आणि फायनल सीझन भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी उत्कंठा वाढवणारा ‘स्क्विड गेम ३’ (Squid Game 3) चा टीझर रिलीज झाला होता. आता प्रेक्षकांची उत्सुकता अधिक शिगेला पोहोचवणारा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Entertainment update)

नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणाऱ्या ‘स्क्विड गेम ३’ च्या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा स्पर्धक जीवघेणा खेळ शेवटचा खेळताना दिसणार आहेत. मात्र, यावेळी खेळाचे नियम बदलले असून स्वत:चा जीव यावेळी वाचवण्यासाठी नाती विसरुन खेळावं लागणार आहे. सीरीजच्या ट्रेलरमध्ये एक गेम जिंकलेला स्पर्धक ४५६ शेवटपर्यंत जात असल्याचं दिसतं. त्यासोबतच मुखवट्यामागचे बरेच चेहरेही समोर येताना दिसतात. आता या फायनल सीझनमध्ये कोण जिंकणार? आणि नेमकं खेळाचा शेवट कसा होणार हे पाहाणं महत्वाचं असणार आहे.(Bollywood news)
================================
हे देखील वाचा: Netflix वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!
=================================
दरम्यान, २०२१ मध्ये ‘स्क्विड गेम’चा पहिला सीझन रिलीज झाला होता. भारतातील प्रेक्षकांनी अगदी कमी कालावधीत या सीरीजला उत्तुंग प्रतिसाद दिला होता. पहिल्या सीझनच्या यशानंतर २६ डिसेंबर २०२४ ला दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आणि आता २७ जून २०२५ला ‘स्क्विड गेम ३’ नेटफ्लिक्सवर एका मोठ्या ट्विस्टसह रिलीज होणार आहे.(Korean web series)