Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Star Pravah: महानायिकांची ‘महावटपौर्णिमा’: मराठी TV च्या इतिहासात पहिल्यांदाच, पर्यावरण रक्षणासाठी १५ नायिका एकत्र! 

 Star Pravah: महानायिकांची ‘महावटपौर्णिमा’: मराठी TV च्या इतिहासात पहिल्यांदाच, पर्यावरण रक्षणासाठी १५ नायिका एकत्र! 
Star Pravah Actress
टीव्ही वाले मिक्स मसाला

Star Pravah: महानायिकांची ‘महावटपौर्णिमा’: मराठी TV च्या इतिहासात पहिल्यांदाच, पर्यावरण रक्षणासाठी १५ नायिका एकत्र! 

by Team KalakrutiMedia 04/06/2025

Star Pravah: वरुणराजाचे आगमन होताच सणांचा सिजन सुरू होतो, आणि वटपौर्णिमा हा त्यातला एक खास सण! पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम, समर्पण आणि निसर्गसंवर्धनाचा संदेश देणारा हा दिवस आता एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येतोय. पहिल्यांदाच, स्टार प्रवाह वाहिनीवरील १५ लोकप्रिय मराठी नायिका एकत्र येऊन वटपौर्णिमेचे खरे स्वरूप आणि त्यामागील सामाजिक संदेश अधिक ठळकपणे मांडणार आहेत. वटपौर्णिमा म्हणजे केवळ वडाच्या झाडाभोवती सात फेरे घेऊन सौभाग्याची प्रार्थना करण्याचा दिवस नाही, तर तो पर्यावरण रक्षणाचा एक प्रभावी संदेश देणारा सण आहे. वड हे दीर्घायुषी झाड, जे पिढ्यानपिढ्या आपल्याला सावली, प्राणवायू आणि आशीर्वाद देत आले आहे. त्याचे रक्षण करण्याचा निर्धार यंदाच्या ‘महावटपौर्णिमा‘ विशेष भागात दिसणार आहे.(Star Pravah Mahanayikanchi Mahavatpurnima)

Mahanayikanchi Mahavatpurnima
Star Pravah Actress

या विशेष भागात, आपल्या आवडत्या मालिकांमधील नायिका शुभा, सायली, नंदिनी, कला, अबोली आणि इतर – एकत्र येऊन समाजात झाडांवरील होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणार आहेत. व्रताचे धागे तोडणाऱ्या वाईट प्रवृत्तींना सडेतोड उत्तर देणाऱ्या या ‘रणरागिणी‘ एक सामाजिक भान जागवणार आहेत. स्टार प्रवाह वाहिनीचा ‘मराठी परंपरा, मराठी प्रवाह’ हा ब्रीदवाक्य जपत, परंपरेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा खास भाग म्हणजे एक प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे.

i Mahavatpurnima
Star Pravah Actress

‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ फेम निवेदिता सराफ म्हणतात, “१५ नायिका, त्यांची पात्रं आणि एक सामूहिक उद्दिष्ट – हा केवळ शूटिंग नव्हे, तर एक सुंदर समारंभ वाटला. झाडांचे संरक्षण ही आजची खरी गरज आहे आणि आम्ही त्याच भावनेने काम केलं.” ‘ठरलं तर मग’ मधील सायली, जुई गडकरी सांगतात, “हे फक्त महासंगम नसून एक चळवळ आहे. वडाच्या झाडाच्या सान्निध्यात ४ दिवस शूटिंग करताना आम्हाला निसर्गाशी जोडलेपणं पुन्हा जाणवलं. ही एक अविस्मरणीय अनुभूती होती.” (Star Pravah Mahanayikanchi Mahavatpurnima)

==================================

हे देखील वाचा: Mrunmayee Deshpande: ६ अभिनेत्यांसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार!

==================================

हा खास भाग ‘महानायिकांची महावटपौर्णिमा’ रविवार, ८ जून रोजी दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता, स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aai baba retread hot aahet Celebrity Celebrity News Entertainment mahavatpurnima Marathi Serial marathi serial actress Star Pravah tharal tar mag
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.