Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

Panchayat 4 : सचिवजी ते मंजू देवी… जाणून घ्या कलाकारांनी सीरीजसाठी किती घेतलं मानधन!
फुलेरा गाव आणि गावातील पंचायत निवडणूकीने लोकांना अक्षरश:वेडं केलं आहे. ‘पंचायत’ (Panchayat Web Series) या वेब सीरीजचे तीन भाग लोकप्रिय झाल्यानंतर आता लवकरच ‘पंचायत ४’ (Panchayat Season 4) रिलीज होणार आहे. जितकं सीरीजचं कथानक गाजलं तितकीच प्रत्येक पात्र देखील लोकप्रिय झाली. सचिवजी, प्रधानजी, मंजु देवी आणि इतर कलाकारांनी एकीकडे चर्चा असताना आता या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी किती मानधन घेतलं आहे हे समोर आलं आहे. जाणून घेऊयात….(Entertainment news)

‘पंचायत’ सीरीजमध्ये प्रधानजी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेते रघुबीर यादव यांनी दर एपिसोडसाठी ४० हजार फी घेतली असून पंचायत ४ या सीझनसाठी त्यांनी ३.२ लाखांचं एकूण मानधन घेतलं आहे. तर, मंजू देवी ही भूमिका साकारणाऱ्या नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी दर एपिसोडसाठी ५० हजार रुपये घेत एकूण ४ लाख रुपयांचं मानधन घेतलं आहे. तर, विकासची भूमिका साकारणाऱ्या चंदन रॉय याने दर एपिसोड २० हजार घेत एकूण १.६ लाख, सचिवजींची भूमिका साकारणाऱ्या जितेंद्र कुमार याने दर एपिसोड ७० हजार घेत एकूण ५.६ लाख या सीझनसाठी मानधन घेतलं आहे.(Web series in India)
================================
हे देखील वाचा: Panchayat 4: फुलेरा गावात रंगणार निवडणूकीची रणधुमाळी; ‘पंचायत’चा टिझर रिलीज
=================================
२०२० मध्ये ‘पंचायत’ सीजीझचा पहिला सीझन आला होता. पहिल्या सीझनपासूनच कथा आणि पात्रांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. पंचायतमध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, चंदन रॉय, दुर्गेश कुमार, अशोक पाठक, फैसल मलिक, सुनीता रजवार आणि पंकज झा असे अनेक कलाकार असून वेब सीरीजची कथा चंदन कुमार यांनी लिहिली आहे, तर दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे. ‘पंचायत’४ प्रेक्षकांना २ जुलै २०२५ पासून Amazon Prime Video वर पाहता येणार आहे. (Entertainment Tadaka)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi