Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Bollywood Movie : ४३ कोटींचं चित्रपटाचं बजेट पण अभिनेत्रीने परिधान केलेले २०० किलोंचे दागिने
चित्रपट अव्वल दर्जाचा करण्यासाठी बजेट तगडं असावं लागतं… केवळ सेट नाही तर कलाकारांचे कपडे, दागिने यांच्यावरही अमाप पैसा खर्च करावा लागतो. त्यातच जर का ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘रामलीला’ यासारखे संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचे भव्य चित्रपट असतील तर प्रेक्षकांना Larger Than Life अनुभव मिळतोच. मात्र, बॉलिवूडमध्ये एकेकाळी असा एक चित्रपट आला होता ज्याचं बजेट अवघं ४३ कोटींचं होतं पण चित्रपटातल्या अभिनेत्रीने जवळपास २०० किलोंचे दागिने घातले होते आणि तिचं रक्षण करायला ५० बॉडिगार्ड तिच्या अवतीभवती होते. कोणता आहे हा चित्रपट जाणून घेऊयात…(Bollywood News)

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी लगान चित्रपट देऊन एक बेंचमार्क सेट केला होताच. मात्र, ‘जोधा अकबर’ हा ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत त्यांनी संजय लीला भन्साळी यांनाही टक्कर दिली होती. २००८ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात ह्रितिक रोशन (Hrithik Roshan) आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आणि त्यातच ऐतिहासिक चित्रपट असल्यामुळे भव्यता दाखवणं गरजेचं होतंच. या चित्रपटात ऐश्वर्या राय (Aishwerya Rai) हिने महाराणी जोधाची भूमिका साकारली होती. आणि या भूमिकेसाठी चक्क तिने २०० किलोंच्या आसपास दागिने घातले होते. (Aishwerya Rai in Jodha Akbar Movie)

‘जोधा अकबर’ या चित्रपटातील ऐऐश्वर्या रायचे दागिने एकूण ७० कारागिरांनी तयार केले होते. जे तयार करण्यासाठी त्यांना जवळपास २ वर्ष लागली होती. त्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये मोती आणि इतर मौल्यवान धातूंचाही वापर करण्यात आला होता. आता इतके महागडे दागिने ऐश्वर्याने घातले म्हणजे तिचं रक्षण करायला हवंच. जोधा अकबरच्या सेटवर ऐश्वर्याच्या संरक्षणासाठी तब्बल ४० बॉडीगार्ड तैनात होते.
================================
=================================
‘जोधा अकबर’ या चित्रपटाने २००८ मध्ये देशात ७७.८५ कोटी, आणि जगभरात ११२ कोटींचा व्यवसाय करत आत्तापर्यंत लाईफटाईम कमाई ३१२ कोटी इतकी केली आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या या एकमेव ऐतिहासिक चित्रपटात ऐश्वर्या आणि ह्रितिक रोशन सोबत इला अरुण, सोनू सूद, पूनम सिन्हा, मनवा नाईक, दिशा वाकानी असे अनेक कलाकार झळकले होते.(Jodha Akbar movie cast)