लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Panchayat Season 4 Release Date: अखेर ‘पंचायत 4’ चा ट्रेलर प्रदर्शित; आता ‘या’ दिवशी होणार प्रीमियर!
Panchayat Season 4: ‘पंचायत’ या लोकप्रिय वेबसीरीजच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्राइम व्हिडिओने अखेर पंचायत सीझन 4 (Panchayat Season 4) चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. सुरुवातीला हा सीझन 2 जुलै रोजी प्रीमियर होणार होता, पण निर्मात्यांनी आता रिलीजची तारीख आधी आणत आता २४ जून जाहीर केली आहे. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चाहत्यांनी नवा सीझन लवकर पाहण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे. या नव्या सीझनमध्ये फुलेरा गावात राजकीय वातावरण खूपच तापलेलं दिसणार आहे. (Panchayat Season 4 Release Date)

पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंजू देवी आणि बनरकास यांची पत्नी क्रांति देवी यांच्यात आता थेट टक्कर होणार आहे. ट्रेलरमध्ये त्यांच्यातील जोरदार प्रचार, नारेबाजी आणि गावात तयार होणारा तणाव दर्शवण्यात आला आहे. एकीकडे हसतमुख चेहऱ्यांच्या मागे लपलेले वैयक्तिक आणि राजकीय हेतू, तर दुसरीकडे गावकऱ्यांची प्रतिक्रिया हे सगळं नव्या सीझनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.

ट्रेलरमध्ये एक गोड ट्विस्ट देखील आहे, सचिवजी म्हणजेच अभिषेक आणि रिंकी यांच्यातील नातं आता अधिक खुलत असल्याचे सूचित होतं आहे. जितेंद्र कुमार आणि संविका यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना भावून जाणार आहे. ‘पंचायत’ ही सीरीज़ TVF – द वायरल फीवर यांनी निर्माण केली असून, दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार यांनी याचे लेखन व संकलन केलं आहे. दिग्दर्शनाची धुरा दीपक मिश्रा आणि अक्षत विजयवर्गीय यांनी सांभाळली आहे. या सीझनमध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, चंदन रॉय, संविका, दुर्गेश कुमार आणि अशोक पाठक यांसारख्या लोकप्रिय कलाकारांची दमदार उपस्थिती असणार आहे.(Panchayat Season 4 Release Date)
===============================
===============================
२ मिनिटं २९ सेकंदांचा हा ट्रेलर प्रदर्शित होताच चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. निर्मात्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे– “शुरू हो चुका है इलेक्शन! मंजू देवी या क्रांति देवी, किसकी होगी सेलेक्शन? #पंचायतऑनप्राइम, नया सीजन, 24 जून.” २४ जून रोजी प्राइम व्हिडिओवर ‘पंचायत सीझन 4’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर तयार राहा फुलेराच्या राजकीय रणभूमीसाठी!