
Anita Date : “रस्त्यात चालणारी ती एक बाई आणि चकवा…”
मालिकाविश्व गाजवणारी अभिनेत्री अनिता दाते (Anita Date) चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारत आहे. ‘तुंबाड’ (Tumbaad Movie) चित्रपटातील तिची भूमिका आजही प्रेक्षकांकडून नावाजली जाते. आणि आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटातील तिची भूमिका विशेष लक्षवेधी आहे. अमृता सुभाष (Amruta Subhash) आणि अनिता यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या जारण चित्रपटाची कथा काळी जादू आणि कर्मकांडावर आधारित आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अनिताने चित्रपटाच्या विषयाला अनुसरुनच एक भयावह अनुभव शेअर केला आहे.(Marathi Horror Movies)

अनिता दाते हिने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गोव्यात लागलेला चकवा आणि नाटकाला जाताना रस्त्यात दिसलेल्या एका बाईचा किस्सा सांगितला. अनिता म्हणाली की, “नाटकाच्या दौऱ्यासाठी आम्ही निघालो होतो. लातूरमध्ये प्रयोग होता. आणि लातूरवरुन आम्हाला विदर्भात जायचं होतं. पहाटे ३.३० वाजता आम्ही प्रवास करत होतो आणि त्याचवेळी रस्त्यावर आम्हाला एक बाई दिसली. ती एकटीच चालली होती आणि ती रडत होती असं वाटत होतं. मी आणि माझी मैत्रीण तेव्हा ड्रायव्हरच्या शेजारी बसलो होतो. आम्ही त्या ड्रायव्हरला म्हटलं की थांबा ना, ती बाई अशी चाललीये. त्यावर कोणीच काही बोललं नाही. आणि गाडी पुढे गेली”.(Marathi entertainment news)
पुढे अनिताने गोव्यातही चकवा लागल्याचा अनुभव सांगताना म्हटलं की, “गोव्यावरुन येताना तेव्हा आशालता वाबगावकर गाडीत होत्या. तेव्हा चकवा लागल्यासारखं झालं आणि गाडी तिथेच फिरत होती. गोव्यातून आम्ही बाहेरच पडत नव्हतो. मग आशाताईंनी गाडीतून सगळ्यांना बाहेर उतरवलं. आणि मग आम्ही सगळे गाडीच्या समोर उभे राहिलो. त्यांनी काहीतरी मंत्र म्हटले आणि मग नारळ फोडला आणि आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि गाडी निघाली. त्यानंतर आम्ही मग कोकणात शिरलो”, असे दोन भयावह अनुभव अनिताने शेअर केले.(Entertainment)
================================
हे देखील वाचा: Jarann Movie: सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले करणार प्रेक्षकांवर ‘जारण’
=================================
दरम्यान, मराठीमध्ये कायमच वेगवेगळ्या विषयांवर आधारित कलाकृती तयार होत असतात.परंतु, हॉरर किंवा थ्रिलर कलाकृतींना मग त्या मालिका असो किंवा चित्रपट प्रेक्षक कायमच पसंती देतात. ऋषिकेश गुप्ते दिग्दर्शित ‘जारण’ (Jaaran Movie) चित्रपटात अमृता सुभाष, अनिता दाते, सीमा देशमुख, राजन भिसे, ज्योती मालशे, किशोर कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ६ जून २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने अतातापर्यंत बॉक्स ऑफिसवर १.३६ कोटी कमावले आहेत.(Jaaran Movie cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi