Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार Pooja Sawant

Dharmendra ने ‘त्या’ रात्री तब्बल शंभर पत्रे लिहून पोस्ट केली!

‘देवबाभळी’नंतर Paresh Rawal  यांना केल आणखी एका मराठी नाटकाच कौतुक;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Airplane Crash : ‘या’ २ कलाकारांनीही विमान दुर्घटनेत गमावला होता जीव, बॉडीची ओळखही पटली नव्हती

 Airplane Crash : ‘या’ २ कलाकारांनीही विमान दुर्घटनेत गमावला होता जीव, बॉडीची ओळखही पटली नव्हती
मिक्स मसाला

Airplane Crash : ‘या’ २ कलाकारांनीही विमान दुर्घटनेत गमावला होता जीव, बॉडीची ओळखही पटली नव्हती

by रसिका शिंदे-पॉल 13/06/2025

१२ जून २०२५ चा दिवस भारतासाठी काळा दिवस ठरला. अहमदाबाद येथे एअर इंडियाचं विमान क्रॅश (Ahemdabad Airplane Crash 2025) होऊन २४० प्रवासी, क्रु मेंबर आणि नागरिकांना दुर्दैवी अंत झाला. अहमदाबादहून लंडनला जाणारं हे विमान टेक ऑफ झाल्यानंतर अवघ्या काही अंतरावर जाऊन क्रॅश झालं. दरम्यान, विमान क्रॅश होऊन कोसळण्याची ही पहिली घटना नसून यापूर्वीही भारतात विमान क्रॅश होऊन शेकडो जणांना जीव गेला आहे. यापूर्वी घडलेल्या विमान दुर्घटनेत भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन कलाकारांचा मृत्यू देखील झाला होता. (Trending News)

साधारण २१ वर्षांपूर्वी अशीच एक भयावह घटना घडली होती. विमानाने टेक ऑफ केलं आणि काही अंतरावर जाऊन कोसळलं आणि प्रवाशी, क्रु मेंबर यांना जीव गमवावा लागला होता. २००४ मध्ये झालेल्या या विमान अपघातात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ‘सुर्यवंशम’ (Sooryavansham) चित्रपटात झळकलेली दाक्षिणात्य अभिनेत्री सौंदर्या (Soundarya) हिचा अंत झाला होता. दुर्दैवाची बाब म्हणजे त्यावेळी ती गरोदर होती. १७ एप्रिल २००४ रोजी तेलुगू अभिनेत्री सौंदर्या कर्नाटकातील जक्कूर एअरबेस येथून भाजपच्या प्रचारासाठी आंध्र प्रदेशातील करीमनगरला निघाली होती. सौंदर्या आणि तिचे सहकारी सेसना १८० विमानाने उड्डाण करत होते. (Entertainment News)

विमानाने टेक ऑफ केलं आणि पुढच्या पाचच मिनिटात विमानाला आग लागली आणि ते कोसळलं. या भीषण अपघातात सौंदर्या, तिचा भाऊ अमरनाथ भाजप कार्यकर्ते रमेश कदम आणि पायलट जॉय फिलिप्स यांचा मृत्यू झाला होता. भयावह बाब म्हणजे मृतदेह इतका जळाला होता की त्याची ओळख पटवणं देखील अशक्य झालं होतं. या विमान अपघाताची दृश्य पाहून सगळेच हादरून गेले होते. या घटनेला २० वर्ष उलटून गेली असली तरीही आजही तो विमान अपघात अंगावर शहारे आणतो.(Bollywood News)

================================

हे देखील वाचा: “जगासाठी ते ‘अमित’जी असतील पण माझ्यासाठी ते…” काय म्हणाले Sachin Pilgoankar?

=================================

२००४ च्या या विमान दुर्घटनेआधी १९८५ साली देखील असाच एक अपघात झाला होता. ‘नदिया के पार’ या चित्रपटातील अभिनेता इंदर ठाकूर (Inder Thakur) आपल्या पत्नी व मुलासह एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करत होते.विमान उतरण्याच्या ४५ मिनिटांपूर्वी दहशतवाद्यांनी ते हवेतट बॉम्बने उडवले होते. या भयानक अपघातात ३०७ प्रवासी आणि २२ क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता. ज्यावेळी विमानाचा स्फोट झाला तेव्हा ते समुद्रावर असल्यामुळे समुद्रातून फार कमी मृतदेह बाहेर काढले गेले होते.

दरम्यान, अहमदाबाद येथे झालेल्या या विमान दुर्घटनेत २४० पेक्षा अधिक जणांना मृत्यू झाला असून त्यात वैमानिक, क्रु मेंबर्स यांचाही समावेश आहे. इतक्या मोठ्या अपघातातून केवळ एकच प्रवासी बचावला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. (Latest News)

Get Latest Marathi Entertainmentupdate | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress ahemdabad airplane crash 2025 air india airplane crash 2004 airplane crash in india Bollywood Bollywood Chitchat bollywood update Entertainment Featured soundarya
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.