“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar

The Bengal Files: पल्लवी जोशीची ऐतिहासिक भूमिका; साकारणार १०० वर्षांची महिला
बालकलाकार ते निर्माती असा प्रवास करणारी अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) लवकरच विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द बंगाल फाईल्स’ (The Bengal Files) चित्रपटात झळकणार आहे. काश्मीर फाईल्स प्रमाणेच भारताच्या इतिहासातील महत्वाच्या पण कधीच जगासमोर न आलेल्या काही घडामोडी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे. समाजाभिमुख कथानक असलेल्या या चित्रपटात पल्लवी जोशी एक विशेष भूमिका साकारणार आहे. (Bollywood news)

मार्मिक, भावपूर्ण आणि ह्रदयस्पर्शी भूमिका साकारण्यासाठी पल्लवी जोशी ओळखली जाते. द बंगाल फाईल्स या चित्रपटात माता भारती या भूमिकेत पल्लवी दिसणार असून देशाच्या ममता, निरागसता आणि जिद्दीचं हे पात्र प्रतिक आहे. मात्र ही भूमिका साकारणं पलल्वीच्या दृष्टीने सोप्पं नव्हतं असं एका मुलाखतीत तिने मान्य केलं आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना पल्लवी म्हणाली की,“हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण भूमिकांपैकी एक होता. १०० वर्षांच्या वयस्कर बाईची भूमिका साकरणं आणि तंतोतंच तसं दिसणं हे सोप्पं नाही. प्रोस्थेटिक मेकअपमुळे मी बर्याच वेळा भयावह दिसत होते, पण आम्हाला एक असे चेहरा हवा होता जो प्रेमळ आणि निरागस वाटावा. ‘माता भारती’ची या पात्रात आपुलकी दिसायला हवी होती.”(Entertainment latest news in marathi)

पुढे म्हणाली, “माझ्याकडे ही भूमिका साकारण्यासाठी एकच संदर्भ होता तो माझ्या आजीचा.आम्ही माता भारती या लुकवर जवळपास ६ महिने काम केलं होतं. त्या काळात मी स्किन केअर पूर्णपणे बंद केली होती, जेणेकरून माझी त्वचा कोरडी आणि वृद्ध वाटावी. रोज मी ‘माता भारती’ आणि त्यांच्या डिमेन्शिया या अवस्थेवर काम करत ती माझ्या अंगवळणी पाडण्याचा प्रयत्न सातत्याने करत होते.”(Bollywood Tadaka)
================================
हे देखील वाचा: Supriya : चमेलीच्या भूमिकेत सुप्रिया नाही तर पल्लवी जोशी असत्या?; काय आहे किस्सा…
=================================
‘द बंगाल फाइल्स’ चित्रपटाची कथा विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी लिहिली असून, अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशीच्या संयुक्त निर्मितीत तयार झाली आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, अनुपम खेर आणि दर्शन कुमार यांच्या भूमिका आहेत. विवेक अग्निहोत्री यांच्या ‘फाइल्स ट्रिलॉजी’चा हा तिसरा भाग असून यापूर्वी ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द ताशकंद फाइल्स’ प्रदर्शित झाल्या आहेत. आधी या चित्रपटाचं नाव द दिल्ली फाईल्स असं होतं जे बदलून ‘द बंगाल फाइल्स’ करण्यात आलं. विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांचा हा आणखी एक वास्तवदर्शी आणि समाजाची दिशा बदलवणारा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (Vivek Agnihotri Films)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi