‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Deepika Padukone : विवेक अग्निहोत्री दीपिका हिला मुर्ख म्हणाले?
२०२० मध्ये दीपिका पादूकोण (Deepiak Padukone) हिचा ‘छपाक’ चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दीपिका थेट दिल्लीत जेएनयूमध्ये (Jawaharlal Nehru University) पोहोचली होती. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली होती आणि त्या आंदोलनात दीपिका सहभागी झाली होती असं सांगण्यात आलं. आता विवेक अग्निहोत्री यांनी या विषयावर भाष्य केलं असून दीपिकाबद्दलही त्यांनी महत्वाचा खुलासा केला आहे. (Entertainment)

विवेक अग्निहोत्री सध्या ‘द बंगाल फाईल्स’ (The Bengal Files) चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका मुलाखतीमध्ये त्यांनी दीपिकाच्या जेएनयू व्हिजिटबद्दल भाष्य केले आहे. विवेक म्हणाले की, “दीपिकाला माहित असतं की ती नक्की काय करतेय, तर कदाचित ती गेली नसती. त्यावेळी जेएनयूमध्ये चेहरे लपवून आलेल्या काही लोकांनी कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता, या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात दीपिका सहभागी झाली होती. यानंतर दीपिकावर प्रचंड टीका झाली होती आणि परिणामी ‘छपाक’ चित्रपट फ्लॉप ठरला होता.(Bollywood News)

शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले, “मी खात्रीने सांगू शकतो की दीपिका जेएनयूमध्ये गेली, तेव्हा तिला तिथल्या राजकारणाबद्दल काहीच माहित नव्हतं.” यावर शुभंकर म्हणाले की दीपिका मूर्ख आहे, असं म्हणायचा तुम्ही प्रयत्न करताय का? त्यावर विवेक म्हणाले, “हे मूर्ख असण्याबद्दल नाही. तिच्या पीआरने तिला सांगितलं असेल की ही चित्रपट प्रमोट करण्याची चांगली संधी आहे. पण दीपिकाला जर माहित असतं की हा किती संवेदनशील विषय आहे, तर ती कधीच गेली नसती.”(Deepika Padukone movies)

दीपिका खूप समजूतदार आहे, असं म्हणत विवेक अग्निहोत्रींनी तिचं कौतुक केलं. “मी तिला वैयक्तिकरित्या ओळखत नाही, त्यामुळे तिची विचारसरणी काय आहे हे मी सांगू शकत नाही. पण मला हे माहित आहे की ती एक अतिशय समजूतदार आणि बुद्धिमान महिला आहे. जर तिला माहित असतं की ती राजकीयदृष्ट्या संवेदनशील जागा आहे आणि तिचा तिच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो, तर ती कधीही तिथे गेली नसती. चित्रपट प्रमोशन दरम्यान बरेच लोक बऱ्याच गोष्टी बोलत असतात. काय करावं, कोणाशी बोलावं? हे स्टार्सना सागंत असतात. पण ही तिच्या पीआरची चूक होती, त्यांना वाटलं की ही एक घटना आहे. पण ती घटना नव्हती. राजकीय विषयात पडल्याने आतापर्यंत अनेक मोठे लोकही अडकले आहेत.
================================
हे देखील वाचा: The Bengal Files: पल्लवी जोशीची ऐतिहासिक भूमिका; साकारणार १०० वर्षांची महिला
=================================
दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांच्या ट्रायॉलॉजीमधला तिसरा चित्रपट द बंगाल फाईल्स १५ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात पल्लवी जोशी, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.