Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

कलात्मक चित्रपटाची नांदी देणारा : Bhuvan Shome!

लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न

Sandhya : ‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम काळाच्या पडद्याआड

Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकला साखरपूडा; पण

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Digpal Lanjekar : शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प ‘रणपति शिवराय’- स्वारी

२०२५ मधील टॉप १० बॉलिवूडच्या यादीत Kantara 1 ची ग्रॅण्ड

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

All Is Well Marathi Movie Trailer:  तीन मित्रांची धमाल गोष्ट सांगणारा ‘ऑल इज वेल’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित !

 All Is Well Marathi Movie Trailer:  तीन मित्रांची धमाल गोष्ट सांगणारा ‘ऑल इज वेल’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित !
all-is-well-marathi-movie-trailer-out-now-a-hilarious-story-of-three-friends-info/
मिक्स मसाला

All Is Well Marathi Movie Trailer:  तीन मित्रांची धमाल गोष्ट सांगणारा ‘ऑल इज वेल’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित !

by Team KalakrutiMedia 17/06/2025

All Is Wel Movie : “तीन तिघाडा, काम बिघाडा” ही जुनी म्हण खोडून काढणारी, तीन मित्रांच्या धमाल मैत्रीवर आधारित ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटाची धमाकेदार एण्ट्री २७ जूनला होणार आहे . नुकत्याच एका विशेष समारंभात या चित्रपटाचा ट्रेलर मोठ्या जल्लोषात आणि कलाकारांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तीन मित्रांची भन्नाट केमिस्ट्री, त्यांचे गंमतीदार किस्से आणि मजेशीर प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. त्यात इतर कलाकारांनी साकारलेली पात्रंही हसवण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत. चित्रपटातील कलाकारांनी यावेळी खास आवाहन करत सांगितलं की, “हा चित्रपट प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणारा आहे” (All Is Well Marathi Movie Trailer)

All Is Well Marathi Movie Trailer

निर्माते अमोद मुचंडीकर आणि वाणी हालप्पनवर, तसेच सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे आणि विनायक पट्टणशेट्टी यांनी यावेळी सांगितले की, “नेहमीपेक्षा काहीतरी हटके आणि मजेशीर तयार करण्याची इच्छा होती. लेखक प्रियदर्शन जाधव, दिग्दर्शक योगेश जाधव आणि कार्यकारी निर्माते संजय ठुबे यांच्या कल्पक सहकार्यामुळे ‘ऑल इज वेल’ साकारता आला.” तसेच हा एक कुटुंबासोबत पाहता येईल असा हसवणूक करणारा चित्रपट असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

================================

हे देखील वाचा: Mauli Maharashtrachi कार्यक्रमातून आदेश बांदेकर घेऊन येणार पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या घरी !

================================

दिग्दर्शक योगेश जाधव यांनी सांगितलं की, “इतक्या अनुभवी कलाकारांसोबत एक वेगळा विषय हाताळण्याची संधी मिळणं हे खूपच आनंददायी आहे. प्रेक्षकांना नक्कीच हा सिनेमा आवडेल याची खात्री वाटते.” ‘ऑल इज वेल’ या चित्रपटाचं एक मजेशीर पोस्टर याआधीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं आणि त्याने उत्सुकता निर्माण केली होती. त्यात आता ट्रेलरची धमाल भर पडल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.

All Is Well Marathi Movie Trailer

चित्रपटात प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर, सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी आणि दिशा काटकर या कलाकारांनी त्यांच्या भूमिकांना न्याय दिला आहे. त्यांची ऊर्जायुक्त कामगिरी ही चित्रपटाचं खास आकर्षण ठरणार आहे. चित्रपटाचे लेखन प्रियदर्शन जाधव यांनी तर दिग्दर्शन योगेश जाधव यांनी केलं आहे. निर्मितीची जबाबदारी अमोद मुचंडीकर आणि वाणी हालप्पनवर यांच्यावर असून, मल्लेश मरुचे आणि विनायक पट्टणशेट्टी यांनी सहनिर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. संजय ठुबे हे कार्यकारी निर्माते आहेत. (All Is Well Marathi Movie Trailer)

================================

हे देखील वाचा: Amitabh Bachchan यांच्या कोटींच्या संपत्तीचा कोण होणार वारसदार? बिग बीने दिलं स्पष्ट उत्तर म्हणाले… 

================================

चित्रपटात संगीत दिग्दर्शन चिनार-महेश आणि अर्जुन जन्या यांचं आहे. रोहित राऊत आणि अपेक्षा दांडेकर यांच्या आवाजातील गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करतील. छायाचित्रण मयुरेश जोशी, संकलन अथश्री ठुबे, नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे, साहसदृश्ये अजय ठाकूर पठाणीया, वेशभूषा किर्ती जंगम, रंगभूषा अतुल शिधये आणि कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे योगदान चित्रपटाला अधिक प्रभावी बनवतात. २७ जूनपासून चित्रपटगृहात “ऑल इज वेल” प्रेक्षकांची धमाल, मस्ती आणि भरपूर हसवणुक करणार यात शंका नाही. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: abhijit chavan Abhinay Berde Ajay Jadhav All Is Well Marathi Movie Trailer Amayra Goswami Disha Katkar Entertainment Madhav Wazhe Marathi Movie Nakshatra Medhekar priyadarshan jadhav Rohit Haladikar sayaji shinde Sayali Phatak
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.