‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

All Is Well Marathi Movie: तीन मित्रांची धमाल गोष्ट ‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात !
मैत्री… ही भावना कुणाहीसोबत जुळते . वय, भाषा, जात, धर्म यापलीकडची. आणि अशीच एक वेगळी, दिलखुलास मैत्रीची गोष्ट आता ‘ऑल इज वेल’ या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘ऑल इज वेल’ ही अमर, अकबर आणि अँथनी या तीन मित्रांची धमाल कथा आहे. त्यांची केमिस्ट्री, मजा आणि मनमोकळं नातं पाहताना प्रेक्षकही हसून हसून बिछान्यावर पडतील. हा चित्रपट मनोरंजन, मैत्री, आणि थोड्या भावनिक वळणांनी सजलेला आहे.(All Is Well Marathi Movie)

चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश जाधव यांचं असून, लेखन प्रियदर्शन जाधव यांनी केलं आहे.अमोध मुचंडीकर आणि वाणी हालप्पनवर यांनी निर्मिती केली आहे. सहनिर्माते आहेत मल्लेश मरुचे आणि विनायक पट्टणशेट्टी. या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर हे तीन धमाल मित्र पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. त्यांच्यासोबत सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी आणि दिशा काटकर हे कलाकार झळकणार आहेत.

चित्रपटात या तीन मित्रांच्या आयुष्यात अचानक काही विचित्र घटना घडतात. परिस्थिती बदलते, फसवणूक होते, पण तरीही ही तिघं एकत्र उभं राहतात. ते संकटावर कशी मात करतात, आणि मैत्रीचं खरं रूप कसं दाखवतात, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. ‘ऑल इज वेल’ या चित्रपटात संगीत चिनार-महेश आणि अर्जुन जन्या यांचं आहे. गाणी रोहित राऊत आणि अपेक्षा दांडेकर यांनी गायलेली आहेत नृत्यदिग्दर्शन, साहसदृश्यं, वेशभूषा, रंगभूषा आणि छायाचित्रण सुद्धा दर्जेदार अशा टीमने केलेलं आहे. (All Is Well Marathi Movie)
===============================
हे देखील वाचा: Sai Tamhankar ला करायच होत आमिर खान शी लग्न म्हणाली, ‘मी आमिरच्या ‘दिल… ‘
===============================
२७ जून रोजी ‘ऑल इज वेल’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतोय. खळखळून हसवणारा , भावनिक प्रसंगाने मनाला स्पर्शून जाणारा आणि मैत्री, नातेसंबंध, फसवणूक अशा गोष्टींवर विचार करायला लावणारा हा सिनेमा पूर्ण कुटुंब एकत्र येऊन बघू शकेल असाच आहे.