Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Diljit Dosanjh : सरदार जी ३ रिलीज झाला तर दिलजीत देशद्रोही ठरेल?

 Diljit Dosanjh : सरदार जी ३ रिलीज झाला तर दिलजीत देशद्रोही ठरेल?
मिक्स मसाला

Diljit Dosanjh : सरदार जी ३ रिलीज झाला तर दिलजीत देशद्रोही ठरेल?

by रसिका शिंदे-पॉल 24/06/2025

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) गेल्या काही काळापासून चांगलाच चर्चेत आहे… काही महिन्यांपूर्वीच युरोपमध्ये झालेल्या त्याच्या एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये रतन टाटा यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर लाईव्ह कॉन्सर्ट थांबवून त्याने टाटांना श्रद्धांजली वाहिली होती… परदेशात आपल्या देशाप्रती त्याने दाखवलेली आत्मियता लोकांना फारच आवडली आणि त्याचं कौतुकंही झालं.. पण आता भारतात पाकिस्तानी कलाकारांना बंदी असूनही त्याच्या आगामी ‘सरदारजी ३’ (Sardarji 3) चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री झळकणार असल्यावरुन आता वाद चांगलाच पेटला आहे… फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज यांनी तर सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहून त्यात असं म्हटलंय की जर का दिलजीत दोसांझचा चित्रपट भारतात किंवा कुठेही रिलीज झाला तर तो आमच्यासाठी देशद्रोही असेल आणि त्याला भारतात कायमची बंदी घालू.. काय आहे नेमकं प्रकरण चला जाणून घेऊयात…(Bollywood news)

पहलगाममध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती जी अजूनही कायम आहेच… त्यामुळे भारतात पाकिस्तानी कलाकार, त्यांचे चित्रपट या सगळ्यावर बंदी असताना दिलजीत दोसांझ याच्या सरदारजी ३ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आधीपासूनच भारतात बॅन असणारी पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर (Hania Aamir) दिसल्यानंतर एकच गदारोळ उडाला.. भारतात सध्या युट्युबवर हा ट्रेलर Available नसला तरी भारतीय अभिनेत्याने देशाच्या विरोधात जाऊन पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत काम केल्यामुळे दिलजीतचे चाहते बरेच संतापले आहेत…लोकांनी सोशल मिडियावर दिलजीतबद्दल नाराजी व्यक्त करत ‘पहलगाम हल्ल्यानंतर दिलजीतकडून अशी अपेक्षा नव्हती’, असं म्हटलंय.. तर काही जणांनी थेट दिलजीतला ‘देश सर्वात आधी येतो आणि तुला पाकिस्तानी कलाकारांसोबत बघून फार वाईट वाटलं’, असं देखील म्हटलं आहे…(Pakistani Celebrities Banned in India)

एकीकडे दिलजीतच्या चाहत्यांनी त्याला सोशल मिडियावर ट्रोल करत चित्रपटासह त्याच्यावरही बंदी घालण्याचं म्हटलंय.. तर दुसरीकडे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे अध्यक्ष बी.एन. तिवारी यांनी ANI शी बोलताना सेन्सॉर बोर्डाकडे त्यांनी एक पत्र दिल्याचं सांगितलं आहे.. त्यात असं लिहिलंय की, सरदारजी ३ चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळू नये.. तसेच, निर्माते, दिग्दर्शक हा चित्रपट भारताबाहेर प्रदर्शित करणार आहेत असंही समजलं आहे; जर ते चित्रपट पाकिस्तानात किंवा परदेशात प्रदर्शित करण्यास तयार असतील, तर ते आमच्यासाठी देशद्रोही आहेत. शिवाय दिलजीत कुठेच गाणं गाऊ शकणार नाही आणि त्याची गाणी देखील रिलीज केली जाणार नाहीत..(Latest Entertainment News)

================================

हे देखील वाचा: Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

=================================

महत्वाचं म्हणजे दिलजीत या चित्रपटात केवळ एक अभिनेता नसून तो प्रोड्युसर देखील आहे.. त्यामुळे आता भारतात तर चित्रपटाला बंदी आलीच आहे पण परदेशातही सरदारजी ३ रिलीज होणार का? आणि जर का झालाच तर दिलजीतसह इतर चित्रपटाच्या मेकर्सनाही देशद्रोह्याचा टॅग लागणार का? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं असून फवाद खान, माहिरा खान, अली जाफर, आतिफ असलम या भारतात बॅन असलेल्या पाकिस्तानी कलाकारांच्या यादीत दुर्दैवाने भारताच्या दिलजीत दोसांझचंही नाव असणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे…(Sardarji 3 Movie controversy)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Celebrity News Diljit Dosanjh Diljit Dosanjh family Entertainment Entertainment News Fawad Khan hania aamir india operation sindoor pahalgam terror attack pakistani celebrities ban in india pakistani celebrity punjabi singer sardarji 3 movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.