‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

GAADI NUMBER 1760: ७७ वर्षीय अभिनेत्री सुहास जोशींनी सिनेमामध्ये केले चक्क ॲक्शन सीन्स !
GAADI NUMBER 1760: तन्वी फिल्म्स प्रस्तुत ‘गाडी नंबर १७६०’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि त्यातलं रहस्य, थरार, ट्विस्ट्स, आणि दमदार अभिनय पाहून प्रेक्षक चकित झाले आहेत. पण या ट्रेलरमधली एक खास गोष्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे, ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांचा जबरदस्त ॲक्शन अंदाज! (GAADI NUMBER 1760)

७७ वर्षांच्या असल्या तरी सुहास जोशी यांनी या चित्रपटासाठी काही विशेष अॅक्शन सीन स्वतः साकारले आहेत. त्यांचं वय, अनुभव, आणि कॅमेऱ्यासमोरचं आत्मभान याचं हे एक अप्रतिम उदाहरण ठरतं. त्यांच्या अभिनयाची आणि जिद्दीची सगळीकडे चर्चा होत आहे. सुहास जोशी यांनी स्वतः सांगितलं की, “वय काहीही असो, जेव्हा एखादी भूमिका मनापासून आवडते, तेव्हा ती पूर्ण ताकदीने निभावावीशी वाटते. या चित्रपटातली माझी भूमिका वेगळी आहे. अॅक्शन सीन करणं ही माझ्यासाठी एक नवीन आणि उत्साही गोष्ट होती. टीमचा पाठिंबा होता, म्हणून मला अजिबात भीती वाटली नाही.”

चित्रपटाचे दिग्दर्शक योगिराज संजय गायकवाड म्हणतात, “सुहास मॅडम म्हणजे एक प्रेरणा आहेत. सुरुवातीला आम्ही त्यांच्या अॅक्शनसाठी बॉडी डबल वापरण्याचा विचार केला होता. पण त्यांनी तो थेट नाकारला आणि सांगितलं, ‘मी स्वतः सीन करणार.’ त्यांच्या आवाजातला आत्मविश्वास पाहून आम्ही थक्क झालो. त्यांच्या जिद्दीमुळे संपूर्ण टीमला एक नवी ऊर्जा मिळाली.”(GAADI NUMBER 1760)
=============================
=============================
‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटात प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, प्रसाद खांडेकर, शशांक शेंडे, श्रीकांत यादव आणि अर्थातच सुहास जोशी अशा अनेक दमदार कलाकारांचा सहभाग आहे. या चित्रपटाचे निर्माते आहेत कैलाश सोराडी आणि विमला सोराडी. चित्रपट ४ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे आणि त्याबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सुहास जोशींची भूमिका काय वळण घेणार? त्यांच्या अॅक्शन सीन किती रंगतील? हे पाहणं खूपच रंजक ठरेल.या वयातही त्यांनी जे समर्पण दाखवलं आहे, त्यातून अभिनयावरील त्यांची निष्ठा दिसून येते आणि नव्या पिढीला एक प्रेरणादायी संदेशही मिळतो , वय काहीही असो, जेव्हा तुमचं काम तुमचं प्रेम असतं, तेव्हा मर्यादा कुठेच उरत नाहीत!