Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे

Independence Day : वीकेंडला बॉलिवूडचे ‘हे’ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट नक्की

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

दादाची दादागिरी आता मोठ्या पडद्यावर; ‘हा’ कलाकार साकारणार Sourav Ganguly ची भूमिका

 दादाची दादागिरी आता मोठ्या पडद्यावर; ‘हा’ कलाकार साकारणार Sourav Ganguly ची भूमिका
कलाकृती विशेष

दादाची दादागिरी आता मोठ्या पडद्यावर; ‘हा’ कलाकार साकारणार Sourav Ganguly ची भूमिका

by रसिका शिंदे-पॉल 26/06/2025

बॉलीवूड आणि बायोपिक… ही सध्या एक नेव्हर एंडिंग लव्ह स्टोरी झालेली आहे. दरवर्षी डझनभर बायोपिक भारतात रिलीज होतात. काही चालतात तर काहींचा बाजारच उठतो. तसं स्पोर्ट्सवर आधारित बरेच बायोपिक आले, पण सर्वात जास्त मार्केट खाल्लं, क्रिकेटवर आधारित चित्रपटांनी ! तसं तर आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ चित्रपटाने क्रिकेटवर आधारित चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली, पण त्यानंतर आलेले अनेक बायोपिक चांगलेच गाजले. महेंद्रसिंग धोनी, कपिल देव, मुहम्मद अझरूद्दीन, मुथय्या मुरलीधरन, मिथाली राज या ग्रेट क्रिकेटपटूंवर चित्रपट आले.(Sports Biopics in Bollywood)

सचिन तेंडूलकरच्या ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ या डॉक्युमेंटरी फिल्मलाही भरभरून प्रेम मिळालं. पण आता लवकरच एका अशा क्रिकेटपटूवर बायोपिक येणार आहे, ज्याच्या क्रिकेटच्या मैदानातील दादागिरीचे किस्से फार गाजलेले आहेत. ते महान क्रिकेटपटू महाराजा ऑफ इंडियन क्रिकेट सौरव गांगुली ! भारताच्या ग्रेटेस्ट कॅप्टन्सपैकी एक असलेल्या सौरव गांगुली यांची स्टोरी लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. पण दादाची भूमिका साकारणार कोण ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, चला तर मग जाणून घेऊया. (Sourav Ganguly Biopic)

गेल्या अनेक दिवसांपासून भारताचे माजी कॅप्टन सौरव गांगुली यांच्या बायोपिकची सर्वत्र चर्चा होती. याला स्वतः दादाने अनेकदा दुजोरा दिला होता. पण मध्यंतरी त्यांनी अचानक आपल्या बायोपिकची घोषणा केली. ज्यामुळे त्यांचे फॅन्स चांगलेच एक्सायटेड होते. पण सर्वात मोठा प्रश्न हाच होता की, दादांची भूमिका कोण साकारणार ? त्यामुळे सिनेलव्हर्स वेगवेगळे तर्कवितर्क लावू लागले. सुरुवातीला रणबीर कपूरच्या नावाची बरीच चर्चा झाली, पण स्वतः रणबीरने असा कोणताही सिनेमा करत नसल्याचं वक्तव्य करत थेट या चर्चांना फुलस्टॉप दिला.

यानंतर दादाच्या रोलसाठी आणखी एक नाव पुढे आलं, ते म्हणजे राजकुमार राव ! राजकुमार सध्या बॉलीवूडमधला आघाडीचा अभिनेता आहे. त्याने गेल्या काही वर्षांत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यातच त्याने सुभाषचंद्र बोस, शाहीद आजमी, ओमर्ता आणि श्रीकांत बोल्ला यांचे बायोपिक्स केले आहेत. त्यामुळे दादा सौरव गांगुली यांच्या भूमिकेला तोच न्याय देऊ शकतो, असं फॅन्सचं म्हणणं होतं. मात्र आता यावर शिक्कामोर्तब झालं असून राजकुमारच दादांच्या भूमिकेत झळकणार आहे. (Bollywood News)

NDTV ला दिलेल्या इंटरव्यूमध्ये राजकुमार म्हणाला की, “डेट्स आणि शुटींगबाबत थोड्या अडचणी आल्या होत्या. ज्यामुळे प्रोजेक्ट अडकला होता. मात्र आता याला हिरवा कंदील मिळाला आहे. या बायोपिकमध्ये दादांच्या क्रिकेट करिअरसोबतच त्यांचं खाजगी आयुष्य, त्यांचा संघर्ष, त्यांची लीडरशिप अशा विविध महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकला जाणार आहे. हा चित्रपट माझ्यासाठी एक विशेष पर्वणी आहे, कारण मी दादांना केवळ एक क्रिकेटर नाही, तर एक उत्तम लीडर मानतो.”

================================

हे देखील वाचा: एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar ?

=================================

त्यामुळे आता लवकरच आपल्या सर्वांना दादा सौरव गांगुली यांची अमेजिंग जर्नी मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. याआधी भारताच्या दोन महान कॅप्टन्स वर चित्रपट आले आहेत. ‘83’ हा कपिल देव आणि १९८३ च्या वर्ल्ड कप विनिंग टीमचा चित्रपट आणि दुसरा म्हणजे ‘एम. एस. धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ हा महेंद्र सिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आपण पाहिलेच असतील. आता सर्व दादाची मैदानावरची दादागिरी चित्रपटगृहांमध्ये पहायला उत्सुक आहेत. दरम्यान निर्मात्यांनी अजूनही याची रिलीज डेट जाहीर केलेली नाही. पण हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. दादाचं क्रिकेट करिअर पहायचं झालं तर त्यांच्या कॅप्टनसीमध्ये इंडियाने २००३ वर्ल्ड कप फायनल, २००० चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल गाठली आहे. तर २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय मिळवला आहे. दादाने ११३ टेस्टमध्ये १६ सेंच्युरीसोबत ७३१२ रन्स केले आहेत. तर ३११ वनडेमध्ये २२ सेंच्युरीसोबत ११,३६३ रन्स आणि १०० विकेट्स घेतले आहेत. (Latest Entertainment News)

-सागर जाधव

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood News bollywood update Celebrities Update in Marathi Celebrity entertainemnt masala Entertainment rajkumar rao movies Sourav ganguly Sourav Ganguly Biopic
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.