‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

‘सितारे जमीन पर’ चित्रपटातून Aamir Khan याचं तगडं कमबॅक!
२०२२ मध्ये आमिर खान (Aamir Khan) आणि करिना कपूर यांची प्रमुख भूमिका असणारा ‘लाल सिंग चड्डा’ (Laal Singh Chaddha) चित्रपट आला होता. सुपरफ्लॉप झालेल्या या चित्रपटानंतर ३-४ वर्ष आमिर चित्रपटांतून गायबच झाला होता. आता मात्र, ‘सितारे जमीन पर’ (Sitaare Zameen Par) या चित्रपटातून त्याने पुन्हा एकदा कमबॅक केलं असून या चित्रपटाने प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादासोबत बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कमाई केली आहे. २० जून २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने ७ दिवसांत किती कमाई केली जाणून घेऊयात… (Bollywood News)

‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट २००७ मध्ये आलेल्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचा सीक्वेल आहे. या देखील चित्रपटात स्पेशल लहान मुलांची कथा असून थोडं कथानक वेगळं आहे. यात आमिर खान बास्टेटबॉल कॉचची भूमिका साकारत असून चित्रपटातील प्रत्येक कलाकार Real Special Child आहेत. थ्रिलर, कॉमेडी, हॉरर या चित्रपटांच्या गर्दीत आपलं वेगळंपण साध्य करणाऱ्या सितारे जमीन पर चित्रपटाने किती कमाई केली पाहूयात. सॅकनिल्कच्या माहितीनुसार या चित्रपटाने, पहिल्या दिवशी १०.७ कोटी, दुसऱ्या दिवशी २०.२ कोटी, तिसऱ्या दिवशी २७.२५ कोटी, चौथ्या दिवशी ८.५ कोटी, पाचव्या दिवशी ८.५ कोटी, सहाव्या दिवशी ७.२५ कोटी कमवत आत्तापर्यंत ८२.४ कोटींची कमाई केली आहे. (Sitaar zameen par movie box office collection)

‘सितारे जमीन पर’ चित्रपटातून जवळपास ८-१० वर्षांनंतर जिनिलिया देशमुखही (Genelia Deshmukh) बॉलिवूड चित्रपटात झळकली आहे. तसेच, आनंदाची बाब म्हणजे ‘सितारे जमीन पर’ने रिलीजच्या ७ व्या दिवशी सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटालाही कलेक्शनच्या बाबतीत मागे टाकलं आहे आणि हा चित्रपट २०२५ मधील आत्तपर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा ७ वा चित्रपट बनला आहे. ९० कोटींचं बजेट असणारा हा चित्रपट लवकरच बजेट पार करेल अस चित्र दिसून येत आहे. (Entertainment News Update)
================================
हे देखील वाचा: Sai Tamhankar ला करायचं होतं आमिर खान शी लग्न म्हणाली, ‘मी आमिरच्या ‘दिल… ‘
=================================
दरम्यान, आमिर खान याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकमध्ये दिसणार असून ‘महाभारत’ हा भव्य पौराणिक चित्रपटही तयार करणार आहे. याशिवाय, ‘लाहौर १९४७’ (Lahore 1947 movie) चित्रपटातही तो विशेष भूमिका साकारणार आहे. तर, जिनिलिया देशमुख रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji movie) या चित्रपटात दिसणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi