Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

Marathi Movies: नेहरुंनी कोटावरील दिलेलं गुलाब; कोण आहे ‘हा’ मराठीतला

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या

Abhishek Bachchan : बच्चनपुत्र अभिषेकच्या कारकिर्दीची पंचवीशी

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे

Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“MUMBAI LOCAL” मध्ये फुललेली प्रेमकथा रूपेरी पडद्यावर झळकणार; ‘या’ प्रसिद्ध कलाकारांची जोडी दिसणार !

 “MUMBAI LOCAL” मध्ये फुललेली प्रेमकथा रूपेरी पडद्यावर झळकणार; ‘या’ प्रसिद्ध कलाकारांची जोडी दिसणार !
मिक्स मसाला

“MUMBAI LOCAL” मध्ये फुललेली प्रेमकथा रूपेरी पडद्यावर झळकणार; ‘या’ प्रसिद्ध कलाकारांची जोडी दिसणार !

by Team KalakrutiMedia 27/06/2025

मुंबई शहराची लाइफलाइन, तिची अस्सल ओळख म्हणजे मुंबई लोकल. ही केवळ ट्रेन नाही, ती इथल्या लाखो लोकांची जीवनवाहिनी आहे. याच लोकलच्या गोंगाटात, दाट गर्दीत आणि धावपळीच्या धकाधकीत एक हळुवार प्रेमकहाणी आकार घेताना प्रेक्षकांना “मुंबई लोकल” या नव्या मराठी चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. मुंबई शहराचं हृदय समजली जाणारी मुंबई लोकल आणि तिच्या प्रवासात फुलणारी एक हळवी प्रेमकहाणी हे सगळं आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. १ ऑगस्ट २०२५ ला प्रदर्शित होणाऱ्या “मुंबई लोकल” या आगामी मराठी चित्रपटातून, प्रेक्षकांना एक वेगळी, तरल आणि जिवंत कथा अनुभवता येणार आहे. (MUMBAI LOCAL Marathi Movie)

MUMBAI LOCAL Marathi Movie

या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब (Prathemsh Parab) आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar) पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवर झळकणार आहेत. त्यांच्या अभिनयासोबतच या चित्रपटात मनमीत पेम, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, स्मिता डोंगरे यांसारखे ताकदीचे कलाकार आपली छाप पाडणार आहेत.

=========================

हे देखील वाचा: Halad Rusli Kunku Hasla मालिकेत अभिनेत्री पूजा पवार-साळुंखे दिसणार खलनायिकेच्या दमदार भूमिकेत

=========================

‘बिग ब्रेन प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत आणि अभिजित दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती निलेश राठी, प्राची अग्रवाल, सचिन अग्रवाल आणि तन्वी माहेश्वरी यांनी केली असून, त्र्यंबक डागा सहनिर्माते आहेत. छायांकन योगेश कोळी यांचे, संकलन स्वप्नील जाधव यांचे, तर पार्श्वसंगीत समीर सप्तिसकर यांचे आहे. गीत-संगीत देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी आणि हर्षवर्धन वावरे यांनी दिलं असून, गीतकार अभिजीत कुलकर्णी आणि अभिजित यांच्या लेखणीतून गाणी सजली आहेत.

MUMBAI LOCAL Marathi Movie

मुंबई लोकल या चित्रपटाचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही एक अशी प्रेमकहाणी आहे जी गर्दीतुन फुलत जाणार आहे. लोकलमध्ये रोज घडणाऱ्या लहानसहान गोष्टी, ओळखी, नाती, आणि त्या नात्यांतून उलगडत जाणाऱ्या भावना हे सारं या चित्रपटात सुरेख रेखाटण्यात आलं आहे. मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या लोकलमध्ये फुललेलं प्रेम, अशा प्रकारे मराठीत पहिल्यांदाच साकारणार असल्याने या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता आहे.

=========================

हे देखील वाचा: Ankita Lokhande होणार आई? ; ‘लाफ्टर शेफ्स 2’च्या  नव्या प्रोमोमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली!

=========================

‘टाइमपास’, ‘टकाटक’, ‘बालक पालक’ सारख्या गाजलेल्या चित्रपटातून खळखळून हसवणारा प्रथमेश परब आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या सिनेमात एक वेगळीच जादू निर्माण करणार, यात शंका नाही. “मुंबई लोकल” हा फक्त एक सिनेमा नाही, तर तो आहे एका शहराच्या आणि त्याच्या माणसांच्या अस्सल धकधकीचा, भावनांचा आणि नात्यांचा प्रवास. १ ऑगस्टपासून हा अनुभव मोठ्या पडद्यावर घ्यायलाच हवा असाच असेल यात शंका नाही. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor prathamesh parab actress dayananda tirthankar Entertainment Marathi Movie mumbai local marathi movie Mumbai local movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.