‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Dr. Jabbar Patel यांना राजर्षी शाहू महाराज पुरस्कार प्रदान!
राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात यंदाचा ३९वा शाहू पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल (Dr Jabbar Patel) यांना प्रदान करण्यात आला. भारतीय चित्रपटसृष्टीत गेले अनेक वर्ष आपलं अमुल्य योगदान देणाऱ्या जब्बार पटेल यांना हा पुरस्कार खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी शाहू महाराजांच्या नावाने मिळणारा पुरस्कार अत्यंत सन्मानाचा आहे असं म्हटलं.(Marathi Entertainment News)

दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यात जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात आलेली १ लाखांची रक्कम पटेल यांनी बाबा आमटे यांच्या आनंदवनासाठी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी विभागून दिली आहे. यावेळी जब्बार पटेल म्हणाले की,”माझ्या आयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले, पण शाहू महाराजांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार अत्यंत वेगळा आणि सन्मानाचा आहे. शाहू महाराज हे लोकशाही नसताना लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक करणारे राजा होते. त्यांनी सर्वसामान्यांशी नातं जोडलं आणि पहिल्यांदा आरक्षण लागू केलं. आजही कोल्हापूर चित्रपटांचं विद्यापीठ आहे, इथं माझ्या पहिल्या सिनेमाची सुरुवात झाली. या शहराशी माझं विशेष नातं आहे”. (Marathi Movies)
================================
हे देखील वाचा: Samana Movie : भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक ‘सामना’ची ५० वर्ष पूर्ण!
=================================
जब्बार पटेल यांनी आजवर ‘सामना’, ‘जैत रे जैत’, ‘सिंहासन’, ‘उंबरठा’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘मुक्ता’, ‘तिसरी आझादी’, ‘एक होता विदुषक’, ‘यशवंतराव चव्हाण : बखर एका वादळाची’ अशा अनेक अजरामर चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. दरम्यान, जब्बार पटेल यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेते मामूट्टी यांनी बाबासाहेब, त्रिलोक मलिक यांनी लाला लजपतराय, मोहन गोखले यांनी महात्मा गांधी, सोनाली कुलकर्णी हिने रमाबाई यांच्या भूमिका साकारल्या होत्या.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi