Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे

Independence Day : वीकेंडला बॉलिवूडचे ‘हे’ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट नक्की

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

 Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”
मिक्स मसाला

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

by रसिका शिंदे-पॉल 28/06/2025

२०२५ हे वर्ष मराठी चित्रपटांसाठी फार खास आहे असं नक्कीच दिसतंय… ‘गुलकंद’, ‘आता थांबायचं नाय’, ‘जारण’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादासह बॉक्स ऑफिसवरही छान कमाई करत आहेत… वेगळे विषय आणि आशय प्रेक्षकांसमोर मांडताना मराठी मातीतला तो रांगडेपणा पुन्हा एकदा मराठी चित्रपटांमध्ये दिसतोय.. मात्र, काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला प्रसाद ओक दिग्दर्शित ‘सुशीला-सुजीत’ चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पथ्याला पडला नाही… आता चित्रपटातील नायिकेनेच चित्रपट का चालला नाही यावर उत्तर दिलं आहे…(Marathi Movies 2025)

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘सुशीला सुजीत’ या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी हे दोघे मुख्य भूमिकेत होते. दोन अनोळखी माणसं एकाच घरात एका खोलीत बंद होतात आणि त्यानंतर दोघांच्या वैयक्तिक जीवनात काय घडामोडी घडतात असं चित्रपटाचं कथानक… पण हा चित्रपट चालला नाही… प्रेक्षकांना अपेक्षेपेक्षा बोल्डपणा चित्रपटात दाखवला असं वाटलं… आता चित्रपट का चालला नाही याबद्दल सोनालीने तिचे मत व्यक्त केलं आहे. अमोल परचुरेंच्या कॅचअपमध्ये याबद्दल बोलताना सोनाली म्हणाली की, “‘सुशीला सुजीत’ चित्रपट निवडताना प्रसाद ओकवर विश्वास होता. मला तो दिग्दर्शक म्हणून आवडतो. त्याच्याबरोबर मला दहा वर्षांपुर्वी ‘कच्चा लिंबू’ चित्रपट करताना मजा आली होती. तसंच यावेळी त्याने माझ्याकडे आणलेला विषय हा वेगळ्या धाटणीचा होता आणि या भूमिकेसाठी त्याने माझा विचार करणं यामुळे मला खुप मजा आली होती.”

पुढे ती म्हणाली की,”प्रसादबरोबर काम करताना खूप दमछाक होते. कारण प्रसाद स्वत: खूप चांगला अभिनेता आहे आणि तो एखादा सीन समजावून सांगताना अभिनय करून दाखवतो. हे सगळं जमवून आणणं खूप अवघड असतं. ‘सुशीला सुजीत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची स्वप्नीलने विशेष तयारीसुद्धा केली होती. त्याने व्यवस्थित प्लॅन केला होता. असं करून आपण एखादा सिनेमा करतो. आता तो का चालला नाही याबद्दल बोलण्याचा मला हक्क नाही, कारण मेहनत घेऊनही सिनेमा पुढच्या आठवड्यात जात नाही, यासाठी मला फार वाईट वाटतं आणि याबद्दल मला फेसबुक लाईव्ह करावसं वाटतं की, असं नाकारू नका; कृपया चित्रपट बघा.” (Entertainment Tadaka)

सोनाली पुढे असं देखील म्हणाली की, ” पण आताचा हा काळ गोंधळात टाकणारा काळ आहे असं मला वाटतं. म्हणजे मराठी नाटकं चालत आहेत, मग सगळीच नाटकं चांगली आहेत का? की आपण त्यांना पाठिंबा म्हणून ती नाटकं बघत आहोत. म्हणजे आता प्रेक्षक नाटकं बघायला जात आहेत आणि चित्रपट बघत नाहीत, याची कारणं शोधणं गरजेचं आहे. सिनेमाकडे प्रेक्षक का येत नाहीत, हे शोधण्याची वेळ आली आहे. मला चित्रपट चालला नाही याचं खूप दु:ख झालं.”

तसेच, कुठेतरी मराठी नाटक वर्सेस चित्रपट असं युद्ध सुरु झालं आहे असं म्हणताना सोनाली म्हणाली की, “मी प्रमोशनमध्ये इतकं भरभरून बोलले होते, प्रवास केला, इतक्या जणांना आवाहन केलं होतं, ते खोटं तर नव्हतं. मला असं वाटतं की, मी चांगलं काम केलं आहे. सिनेमा मजेदार आहे. त्यातले एक-दोन मुद्दे आवडणं किंवा न आवडणं आपण मान्य करू शकतो. मला असं वाटतं की, आपण क्लायमेक्ससाठी दिग्दर्शकाला वेठीशी धरू शकत नाही, कारण त्याचे अनेक क्लायमेक्स असू शकतात. त्यावर चर्चा होऊ शकते, पण त्याआधीची अडीच तासांची गोष्ट आपण कशी नाकारू शकतो? सहानुभूतीने बघावं इतकेही आपण भिकेला लागलेलो नाही, पण नाटक वर्सेस सिनेमा असं युद्ध कधी सुरू झालं, याचा विचार करायला पाहिजे.”(Bollywood News Update)

================================

हे देखील वाचा: Marathi in Hollywood : हॉलीवूडमधला मराठी तडका!

=================================

दरम्यान, सोनाली कुलकर्णी हिने १९९२ मध्ये Cheluvi या हिंदी चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती.. त्या पूर्वी नाटकांमध्ये तिची कामं सुरु होतीच…हिंदीत डेब्यू केल्यानंतर १९९४ मध्ये जब्बार पटेल दिग्दर्शित ‘मुक्ता’ चित्रपटातून तिने मराठीत पदार्पण केलं…पुढे ‘दोघी’, ‘दायरा’, ‘मिशन कश्मिर’, ‘दिल चाहता है’, ‘वासुदेव बळवंत फडके’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘सखी’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत…(Sonali Kulkarni Movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Celebrity News Entertainment latest entertainment news Marathi Movie Prasad Oak Sonali Kulkarni susheela sujeet swapnil joshi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.