Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

Dhurandhar चित्रपटाचा टीझर रिलीज, रणवीर सिंगच्या डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना भावला!
बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणारा रणवीर सिंग (Ranveer Singh) याचा ‘धुरंधर’ (Dhurandhar Movie) चित्रपट आता लवकरच रिलीज होणार आहे… या चित्रपटातील त्याच्या लूकचे फोटो आधी सोशल मिडियावर व्हायरल झाले होतेच; आता मात्र, धुरंधर चित्रपटाचा ऑफिशिअल टीझर प्रेक्षकांच्या समोर आला असून चित्रपटातील रणवीर सिंगचा डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना कमालीचा आवडला आहे…(Bollywood News)

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाच्या टीझरमध्ये रणवीर सिंग वाढलेल्या दाढी आणि केसांमध्ये धाकड लूकमध्ये दिसतोय. महत्वाचं म्हणजे सत्य घटनेवर आधारित धुरंधर चित्रपटाची कथा असून यात ४ पुरुषांची आजवर समाजासमोर न आलेली गोष्ट उलगडणार आहे… इतंकच नाही चित्रपटात तुफान अॅक्शनही पाहायला मिळणार आहे… ‘धुरंधर’ चित्रपटात रणवीर सिंगसोबत रणवीरसह संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि यामी गौतम ही कलाकार मंडळी झळकणार आहेत…(Dhurandhar movie cast)
================================
हे देखील वाचा: Don 3 : कियाराच्या जागी ही अभिनेत्री दिसणार?; संजय लीला भन्साळींना केलं आहे असिस्ट
=================================

दरम्यान, ‘धुरंधर’ चित्रपटानंतर रणवीर सिंग फरहान अख्तरच्या ‘डॉन ३’ (Don 3 Movie) मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आधी या चित्रपटात रणवीर सोबत कियारा अडवाणी (Kiara Advani) झळकणार होती; मात्र,तिच्या प्रेग्नसीमुळे तिने या चित्रपटात माघार घेतली असून आता ‘डॉन-३’ मध्ये कोणती अभिनेत्री दिसणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे… कियारा नंतर शर्वरी वाघ (Sharvari Wagh) हिच्या नावाची चर्चा सुरु होती; मात्र, आता क्रिती सेनॉन (Kriti Sanon) हिने रणवीर सिंगच्या वाढदिवसाला त्याला खास शुभेच्छा देत Looking forwad to work with ypu soon असं पोस्टमध्ये लिहिल्यामुळे ‘डॉन ३’ मध्ये रणवीर सोबत ती दिसणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत… डॉन ३ मध्ये आता कोणकोणते कलाकार दिसणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे…(Latest Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi