Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

Kareena Kapoor : कोल्हापुरी चप्पल अन् समुद्रकिनारा; Pradaला टोमणा मारत बेबो म्हणाली…
गेल्या काही दिवसांपासून ‘प्राडा’ (PRADA) या ब्रॅण्डला भारताचा विरोध सहन करावा लागतोय… काही दिवसांपूर्वी झालेल्या एका फॅशन शो मध्ये आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूरी चपला त्यांच्या मॉडल्सने घातल्या होत्या आणि भारताला क्रेडिटही दिलं नसल्यामुळे त्यांना चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं… आता या प्रकरणावर अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) हिने सुचक सोशल मिडिया पोस्ट करत प्राडाला टोमणा मारला आहे…

करिना कपूर कायम आपल्या चित्रपटांसोबतच हटके स्टाईल्ससाठी कायम चर्चेत असते… सध्या ती आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्या एन्जॉय करत असून तिने मस्त समुद्रकिनारी बसलेला तिचा एक फोटो शेअर केला आहे… फोटोत दिसतंय की तिने कोल्हापूरी चप्पल घातल आहे… आणि फोटोला कॅप्शन दिलंय की, “सॉरी प्राडा नाही…पण माझी ओरिजनल कोल्हापुरी चप्पल” (Kolhapuri Chappal)”. करिना कपूरने देसी स्वॅगमध्ये प्राडाला लगावलेला हा टोमणा प्रेक्षकांना फार आवडला आहे… दरम्यान, केवळ करिनाच नाही तर विराट कोहली, आदित्य रॉय कपूर, श्रद्धा कपूर,आमिर खान, नीना गुप्ता,सैफ अली खान, क्रिती सेनॉन अशी बरीच कलाकार मंडळी कोल्हापूरी चप्पल घालून स्टाईल फ्लॉंट करताना दिसतात…
================================
हे देखील वाचा: Raj And Uddhav Thackeray : “मराठी भाषेचा विजय झालाय”; कलाकारांनी व्यक्त केल्या भावना
=================================
दरम्यान, करिना कपूर हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटानंतर अद्याप करिना कोणत्याच चित्रपटात दिसली नाही आहे… मात्र, लवकरच ती नवा चित्रपट घेऊन येईल अशी तिच्या चाहत्यांना अपेक्षा आहे… शिवाय, या वर्षीत तिच्या अभिनय कारकिर्दिला २५ वर्ष पूर्ण झाली असून तिच्या चढत्या ग्राफचं प्रेक्षकांसह समीक्षकांनीही कौतुक केलं आहे…(Kareena Kapoor Movies)