Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

Ajay Devgan : “ही ऑस्कर लेवलची कोरिओग्राफी कोणी केली?”; ‘सन ऑफ सरदार २’ मुळे कलाकार ट्रोल
एखादा चित्रपट कथा, त्यातील गाणी आणि अर्थात कोणते कलाकार आहेत यावर हिट किंवा फ्लॉप ठरतो… आता गाणी म्हटलं की हटके स्टेप्स आल्याच… आणि यात माहिर आहे तो म्हणजे अजय देवगण (Ajay Devgan)… सध्या ‘सन ऑफ सरदार २’ (Son Of Sardar 2) मुळे तो चांगलाच चर्चेत असून यातील ‘पेहला तू, दुजा तू’ हे गाणं ट्रोल होतंय… त्याचं कारण असं की यात अजय देवगण आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्याच्या कॉरिओग्राफीत कलाकार नाही तर केवळ त्यांचे हात नाचताय असं म्हणत प्रेक्षक गाण्याची आणि कॉरिओग्राफरची खिल्ली उडवत आहेत…(Bollywood News)

दरम्यान, या आधी देखील ‘बस तेरी बस ते धुम धाम है’ किंवा ‘पो पो’ या गाण्यांवरुन अजय देवगणच्या युनिक स्टेप्समुळे तो ट्रोल झाला होताच… आणि आता सन ऑफ सरदार २ मधील ‘पेहला तू दुजा तू’ गाण्याच्या स्टेप्सने तर कहरच केला आहे… या चित्रपटातूनृ अजय देवगण व मृणाल ठाकूर पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत, त्यामुळे या फ्रेश जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेतच. मात्र, शिर्षक गीत ट्रोलींगचा विषय ठरला आहे…(Entertainmet Tadaka)

या गाण्याच्या कॉरिओग्राफीवर नेटकऱ्यांनी कमेंट करत आपली मतं व्यक्त केली आहेत…एका नेटकऱ्याने पोस्ट करत लिहिले आहे की, “ धूम धाम गाण्यानंतर अजय देवगणच्या या नवीन युनिक स्टेप्स आहेत”, तर आणखी एकाने लिहिलं आहे की, “या चित्रपटानंतर मृणालचं नाव खराब नाही झालं पाहिजे”, “ही ऑस्कर लेवलची कोरिओग्राफी कोणी केली आहे?” अशा गमतीशीर कमेंट्स केल्या आहेत
================================
हे देखील वाचा: Ajay Devgan : ‘अजय ते विजय साळगांवकर’;बॉलिवूडमध्ये 9 मराठी पात्र साकारणारा देवगण!
=================================
दरम्यान, अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा यांची प्रमुख भूमिका असणारा सन ऑफ सरदार चित्रपट २०१२ मध्ये रिलीज झाला होता… आता ‘सन ऑफ सरदार २’ चित्रपट याचा सीक्वेल असून यात अजय देवगण सोबत सोनाक्षी ऐवजी मृणाल ठाकूर झळकणार आहे… देशभरात अजय देवगणचा हा २४ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. आता गाण्याच्या हुकस्टेप्समुळे आधीच ट्रोल झालेला अजयचा हा चित्रपट हिट होणार की फ्लॉप हे येणारा काळच सांगेल…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi