Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

Sachin Pilgoankar : जयवंत वाडकर यांनी सचिन पिळगांवकरांच्या यशाचं सांगितलं कारण!
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर सध्या त्यांच्या विधानांमुळे चांगलेच चर्चेत आहे… आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये जयवंत वाडकर यांनी सचिन पिळगांवकर यांची एक वेगळी बाजू मांडली आहे… बालकालाकर म्हणन कारकिर्द सुरु करणाऱ्या सचिन यांनी ५० वर्षांपेक्षा अधिक काळ भारतीय चित्रपटसृष्टीत घालवला आहे… वाडकर यांनी याच त्यांच्या काळातील एक खास आठवण शेअर केली आहे…

जयवंत वाडकर यांनी सचिन यांच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये कामं केली… एका मुलाखतीमध्ये त्यांनी आयत्या घरात घरोबा या चित्रपटाची एक आठवण सांगताना म्हटलं की,”सचिन सर तर ग्रेट माणूस आहेत”, असं सांगत ज्येष्ठ मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांनी कौतुक केलं आहे. पुढे वाडकर म्हणाले की, “मी आयत्या घरात घरोबामध्ये पहिलं काम केलं. आमच्यासारखे आम्हीच मध्ये आम्ही होतो. पण आमची नावं नंतर कट झाली. त्यानंतर नवरा माझा नवसाचा तर आजही सुपरहिट आहे. दुसरी फिल्मही खूप चालली. त्यांचा अनुभव म्हणजे ते फार उत्साही आणि सकारात्मक आहेत”.

पुढे ते म्हणाले की, “मी एकदा त्यांना विचारलं की, ९ च्या शिफ्टला नाश्ता का मागवत आहात? कारण आपल्याकडे ९च्या शिफ्टला कुठेच नाश्ता नसतो. त्यावर ते म्हणाले,वाडकर आपण ९ वाजता बोलवतो तेव्हा हे तंत्रज्ञ, स्पॉटबॉय पहाटे कधीतरी घरातून निघालेले असतात. त्यांना खायला मिळालं पाहिजे. नाश्ता मिळाल्यानंतर ऊर्जा मिळते आणि मग ते आनंदाने काम करतात. मग त्यांना एक तास उशिरा सोडलं तरी काही बोलत नाहीत. सचिनजी जे आपण खातात, तेच आपल्याला देतात. इतर ठिकाणी कलाकारांना वेगळं, इतरांना वेगळं दिलं जातं. पण ते म्हणतात, जे मी खाणार तेच सगळ्यांनी खायचं. ही त्यांची जमेची बाजू असून, हेच त्यांच्या यशाचं कारण आहे“.
================================
हे देखील वाचा: Priya Bapat-Umesh Kamat तब्बल १२ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार!
=================================
आजवर सचिन पिळगांवकर यांच्यासोबत जयवंत वाडकर यांनी ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आमच्यासारखे आम्हीच’,’तिचा बाप-त्याचा बाप’ अशा चित्रपटांमध्ये कामं केली आहेत… तर सचिन यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘गंमत जंमत’, ‘माझा पती करोडपती’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’,’आम्ही सातपुते’, ‘आयडियाची कल्पना’ असे अनेक भन्नाट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत… 9Sachin Pilgoankar movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi