Ramayana Movie : १६०० कोटींच्या भव्य ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूरचं

Jab We Met : मुसळधार पाऊस आणि रिअल लोकेशन्सवर शुट झालेले हे चित्रपट माहित आहेत का?
१० लाख, १० कोटी किंवा १०० कोटींचा चित्रपट बनवण्यासाठी मेहनत ही लागतेच… लेखक, दिग्दर्शक, संगीतकार कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासोबतच Atmosphere ची देखील फार महत्वाची भूमिका असते… आता तुम्हाला प्रश्न पडला असेल म्हणजे काय? तर, आजवर भारतीय चित्रपटसृष्टीत कोट्यावधी रुपये खर्च करुन सेट तयार केले गेले, सकाळ, रात्र, ऊन-पाऊस नसला तरी कृत्रिमरित्या तो भासवला गेला… मात्र, असे काही भारतीय चित्रपट आहेत ज्यांनी Real Atmospheric Conditions आणि रिअल लोकेशन्सवर चित्रपटाचं शुटींग केल आहे… जाणून घेऊयात या चित्रपटांबद्दल…(Bollywood News)
रावण
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची प्रमुख भूमिका असणारा रावण हा चित्रपट २०१० मध्ये रिलीज झाला होता… यात खऱ्या खुऱ्या मुसळधार पावसात दिग्दर्शक मणी रत्नम यांनी शुटींग केलं आहे…

तुंबाड
एका मराठमोळ्या दिग्दर्शकाचा हिंदीत तुफान गाजलेला चित्रपट म्हणजे तुंबाड…दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांनी १०-१२ वर्षांपेक्षा अधिक काळ हा चित्रपट तयार व्हावा यासाठी वाट पाहिली होती.. आणि रिअल लोकेशन्स आणि रिअल climatic condition मध्ये जवळपा, ६ वर्ष तुंबाड चित्रपटाचं शुटींग सुरु होतं…

हैदर
शाहिद कपूर याची प्रमुख भूमिका असणारा हैदर चित्रपट २०१४ मध्ये रिलीज झाला होता…यात दाखवलेलं काश्मीर हा सेट नसून खऱ्या खुऱ्या बर्फात चित्रपटाचं शुटींग करण्यात आलं होतं…

३ इडियट्स
आमिर खान, आर माधवन, शरमन जोशी आणि करिना कपूर यांची प्रमुख भूमिका असणारा ३ इडियट्स चित्रपट लडाखमधील Pangong Lake येथे शुट केला गेला होता… आणि या चित्रपटाच्या यशानंतर हा लेक पर्यटकांचं महत्वाचं फिरण्याचं ठिकाण ठरलं…

ताल
ऐश्वर्या राय, अक्षय खन्ना आणि अनिल कपूर यांची प्रमुख भूमिका असणारा ताल चित्रपट १९९९ साली रिलीज झाला होता.. यात भारताचे नैसर्गिक सौंदर्य दाखवण्यासाठी हिमाचल प्रदेशच्या चंबा वॅलीमध्ये शुटींग करण्यात आलं होतं…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi