Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणारा मराठी अभिनेता Kshitish Date ची  हिंदी सीरिजमध्ये एन्ट्री!

 एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणारा मराठी अभिनेता Kshitish Date ची  हिंदी सीरिजमध्ये एन्ट्री!
मिक्स मसाला

एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणारा मराठी अभिनेता Kshitish Date ची  हिंदी सीरिजमध्ये एन्ट्री!

by Team KalakrutiMedia 10/07/2025

मराठी रंगभूमी, सिनेमा आणि मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवणारा अभिनेता क्षितीश दाते आता हिंदी वेबसीरिजच्या माध्यमातून नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मिस्त्री’ या वेबसीरिजमध्ये त्याने बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसोबत काम करत दमदार प्रवेश केला आहे.  ‘मिस्त्री’ या थरारक आणि गूढतेने भरलेल्या वेबसीरिजमधून त्याने हिंदी डिजिटल विश्वात दमदार प्रवेश केला आहे. यामध्ये त्याने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून, त्याच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली आहे.(Actor Kshitish Date)

Actor Kshitish Date

‘मिस्त्री‘ या गूढ-थरारक वेबसीरिजमध्ये क्षितीशने ‘बंटी’ नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या पात्रात त्याने संयम, गंभीरता आणि एक वेगळी छटा पहायला मिळणार आहे. त्याने याआधी प्रामुख्याने विनोदी आणि भावनिक भूमिकांमध्ये काम केलं होतं, मात्र ‘मिस्त्री’मध्ये त्याचा अॅक्शन आणि इन्व्हेस्टिगेशन असलेला शेड प्रेक्षकांना विशेष भावला आहे.

Actor Kshitish Date

या वेबसीरिजमध्ये क्षितीशने राम कपूर, मोना सिंग आणि शिखा तिवारीसारख्या अनुभवी कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली. हिंदीमध्ये काम करण्याचा अनुभव सांगताना तो म्हणतो, “पहिल्यांदाच अशा मोठ्या कलाकारांसोबत शूटिंग करत होतो, पण पहिल्या दिवसापासूनच त्यांनी मला आपुलकीने घेतलं. पोलीस अधिकारी बनण्याचा अनुभवच भन्नाट होता.”मराठी इंडस्ट्रीमध्ये आधीच ओळख निर्माण केलेल्या क्षितीशने ‘धर्मवीर‘ या सुपरहिट चित्रपटात एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. याशिवाय ‘मुळशी पॅटर्न’, ‘फुलवंती’, ‘नवरदेव बीएससी अॅग्री’ यासारख्या चित्रपटांतून आणि ‘देवा शप्पथ’, ‘लोकमान्य’ यांसारख्या मालिकांतूनही तो झळकला आहे.

=================================

हे देखील वाचा: Dashavatar : मराठी चित्रपट ‘दशावतार’च्या फर्स्ट लूकला जागतिक स्तरावर पसंती; अमेरिकन यूट्यूबर्सने केल विशेष कौतुक!  

==================================

त्याचं ‘मी vs मी’ हे नाटक सध्या रंगभूमीवर यशस्वीपणे चालू आहे आणि प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळवतो आहे. ‘मिस्त्री’ ही वेबसीरिज जिओ हॉटस्टारवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असून, रहस्य आणि गुंतागुंत असलेली ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते. त्यातील क्षितीश दातेंची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात येत असून, त्याच्या हिंदी पदार्पणाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Dharmveer Movie eknath shinde Entertainment kshitish date Marathi Movie mystery web series
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.