Kaun Banega Crorepati 17 PROMO: ‘या’ दिवसापासून अमिताभ बच्चन पुन्हा भेटायला येणार

Balasaheb Thackeray ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीला म्हणायचे भूत
मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) त्यांच्या मनमुराद स्वभाव आणि बिंधास्तपणामुळे कायम चर्चेत असतात… नुकताच त्यांनी महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्यासोबत ‘अशी ही जमवा जमवी’ हा चित्रपट केला होता… दरम्यान, नुकतीच त्यांनी अमोल परचुरे या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक खास आठवण सांगितली…

वंदना गुप्ते यांनी खरं तर या आधी बऱ्याच मुलाखतींमध्ये त्यांच्या आणी बाळासाहेब ठाकरे यांच्यात किती छान बॉंडींग होतं याबद्दल खुलासा केला आहे… आता त्यांनी आणखी एक खास आठवण सांगताना म्हटलं आहे की,”बाळासाहेब ठाकरेंचा माझ्यावर खूप जीव होता. ते मला भूत म्हणायचे. त्यांनी कधीच माझं नाव घेतलं नाही”. वंदना पुढे म्हणाल्या की, “माझ्या आईला क्रिकेटची खूप आवड होती, त्यामुळे आम्ही सामना पाहायला जायचो. एकदा मला बाळासाहेब दिसले आणि मी त्यांच्या हाताला धरून थेट पॅव्हिलियनमध्ये गेले आणि त्या दिवसापासून मला क्रिकेटचं वेड लागलं”.
=================================
हे देखील वाचा: Shilpa Shetty : “मी महाराष्ट्राची मुलगी…”,मराठी-हिंदी भाषा वादावर शिल्पाचं सूचक विधान!
=================================
दरम्यान, वंदना गुप्ते यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आजवर त्यांनी ‘पछाडलेला’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘बाईपण भारी देवा’, ‘डबल सीट’, ‘टाईम प्लीज’ अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत…याशिवाय, ‘श्री तशी सौ’, ‘रमले मी’, ‘चार चौघी’ अशा अनेक अजरामर नाटकांमध्ये कामं केली आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi