Housefull 5 OTT: थिएटर्सनंतर आता ओटीटीवर झळकणार ‘हाउसफुल 5’; जाणून घ्या, कधी आणि कुठे

Salman Khan लग्न करणार होता पण नेमकी माशी शिंकली कुठे?
बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त कुणाच्या रिलेशनशिप, ब्रेकअप आणि लग्नाची चर्चा झाली असेल तर ते कपल म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय… (Salman Khan and AIshwerya Rai) १-२ वर्षांच्या रिलेशननंतर सलमान खान याचं वागणं सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर अखेर ऐश्वर्याने त्या नात्यातून काढता पाय घेतला होता… ब्रेकअपच्या कीह वर्षांनी ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्नगाठ बांधली. तुम्हाला माहित आहे का? ऐश्वर्यानंतर सलमानने एका मुलीशी लग्न करायचा निर्णयही घेतला होता… मात्र, माशी कुठेतरी शिंकली आणि सलमानचं लग्न मोडलं… कोण होती ती मुलगी आणि लग्न मोडण्याचं कारण होतं तरी काय? जाणून घेऊयात…(Bollywood Gossips)

तर, गेले अनेक वर्ष सलमान खानचे फॅन्स त्याच्या लग्नाची वाट पाहात आहेत… मात्र, आता तरी ते शक्य होईल असं वाटत नाही… पण काही वर्षांपूर्वी चक्क एका मुलीसोबत तो १० वर्ष रिलेशनमध्ये होता. लग्नाची तारीख फिक्स होणारच होती अशातच त्यांचं ब्रेकअप झालं… जिच्यासोबत सलमान लग्न करणार होता ती होती अभिनेत्री संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani)… एक काळ असा होता जेव्हा संगीता बिजलानी सलमान खानच्या प्रेमात अक्षरश: वेडी होती.

इतकंच नाही तर सलमान खानच्या कुटुंबालाही संगीता सून म्हणून पसंत होती… घरच्यांनी दोघांच्या लग्नाला संमती देत लवकरात लवकर दोघांचं लग्न करुन देण्याचा निर्णय घेतला होता… एकीकडे लग्नाची जोरदार तयारी सुरु होती तर दुसरीकडे सलमान खान लग्न करावे की नाही या गोंधळलेल्या परिस्थितीत होता…तो पुर्णपणे संगीताशी लग्न करायला तयार नव्हता असं त्याच्या एका जवळच्या मित्राने सांगितलं होतं..(Entertainment)
=================================
=================================
सलमान आणि संगाताच्या लग्नाची तारीख २७ मे १९९४ ही फिक्स करण्यात आली होती… मात्र, संगीताला सलमानचं एक सिक्रेट समजलं आणि हे लग्न मोडलं… संगीता बिजलानी हिला सलमान आणि पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अली यांच्यात जवळीकता वाढतेय असं समजलं आणि त्यामुळे त्यांचं ब्रेकअप झालं… मात्र, आजही सलमान आणि संगीताने त्यांच्यातील मैत्रीचं नातं टिकवलं आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi