Housefull 5 OTT: थिएटर्सनंतर आता ओटीटीवर झळकणार ‘हाउसफुल 5’; जाणून घ्या, कधी आणि कुठे

Housefull 5 OTT: थिएटर्सनंतर आता ओटीटीवर झळकणार ‘हाउसफुल 5’; जाणून घ्या, कधी आणि कुठे पाहू शकाल !
साजिद नाडियाडवाला प्रस्तुत ‘हाउसफुल 5′ ही मल्टीस्टारर फिल्म जूनच्या पहिल्या आठवड्यात थेटरमध्ये प्रदर्शित झाली होती. डबल क्लायमॅक्स असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांसमोर धमाकेदार एंट्री घेतली. ‘हाउसफुल ए’ आणि ‘हाउसफुल बी’ या दोन्ही व्हर्जन्सना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि समीक्षकांकडूनही चित्रपटाचं कौतुक करण्यात आलं. आता जवळपास दीड महिना उलटल्यानंतर ही धमाल कॉमेडी फिल्म ओटीटीवर झळकण्याच्या तयारीत आहे. ज्यांना हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी आता तो घरबसल्या पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पण नक्की कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी ते जाणून घेऊयात. (Housefull 5 OTT)

अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, सौंदर्या शर्मा, नरगिस फाखरी आणि चंकी पांडे यांच्यासह अनेक नामवंत कलाकारांनी सजलेल्या या चित्रपटाला रिलीज होऊन पाच आठवडे उलटले आहेत. मात्र अद्याप त्याने 200 कोटींचा टप्पा गाठलेला नाही. Sacnik च्या आकडेवारीनुसार भारतात या सिनेमाने सुमारे 185 कोटींचा बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे, तर वर्ल्डवाइड मिळकतीचा आकडा 288.59 कोटी रुपये इतका आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं एकूण बजेट सुमारे 250 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘हाउसफुल 5’ जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला ‘अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ’वर रिलीज होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप अधिकृत घोषणा किंवा प्लॅटफॉर्मकडून कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. तरुण मनसुखानी दिग्दर्शित या चित्रपटाचं निर्मिती कार्य नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली पार पडले आहे. हा चित्रपट एक धमाल कॉमेडी-थ्रिलर असून, याची चित्रीकरण खास क्रूझवर करण्यात आली आहे. (Housefull 5 OTT)
=================================
=================================
चित्रपटात अक्षय, अभिषेक आणि रितेश यांच्यासोबतच संजय दत्त, फरदीन खान, श्रेयस तळपदे, नाना पाटेकर, जैकी श्रॉफ, डीनो मोरिया, जैकलीन फर्नांडिस, सोनम बाजवा, चित्रांगदा सिंग, जॉनी लिव्हर आणि निकितन धीर यांच्यासारखे अनेक प्रसिद्ध कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. या सिनेमाची कथा एका श्रीमंत उद्योजकाच्या हत्येभोवती फिरते, जो आपल्या संपत्तीचा वारसदार म्हणून जॉलीची घोषणा करतो… आणि त्याच क्षणी त्याचा खून होतो. यानंतर सुरु होतो एक रोमहर्षक आणि गोंधळात टाकणारा कॉमिक थ्रिल!