Asambhav Movie : प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची

Tabu : वयाने १२ वर्ष मोठ्या असलेल्या ‘या’ सुपरस्टारच्या आईची साकारली भूमिका
हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे तब्बू (Tabu)… ‘विजयपथ’, ‘अस्तित्व’, ‘मकबूल’, ‘चिनी कम’, ‘दृश्यम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत… अगदी कमी वयातच तिला ‘बागबान’ चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या बायकोची भूमिका ऑफर झाली होती… मात्र, वयाच्या अटीमुळे तिने तो चित्रपट नाकाराला… परंतु, साऊथमध्ये चक्क तिच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या अभिनेत्याच्या आईची भूमिका तिने साकारली आहे…(Bollywood News)

तब्बूने ज्या कलाकाराच्या आईचं काम केलं होतं ते म्हणजे साऊथमधील सुपरस्टार नंदामुरी नटसिंह अर्थात नंदामुरी बालकृष्ण (बालय्या बाबू) (Nandamuri Balakrishna). त्यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री तब्बू हिने चक्क एकाच चित्रपटात २ भूमिका साकारल्या होत्या… तो चित्रपट म्हणजे ‘चेन्नाकेशव रेड्डी’ (Chennakesava Reddy). या चित्रपटात तब्बूने एकाच वेळी बालय्या बाबू यांच्या पत्नी आणि आईची भूमिका साकारली होती… २००२ मध्ये रिलीज झालेल्या या तेलुगु चित्रपटात तिने डबल रोल केला होता. आजही तब्बूने साऊथमध्ये फॅन्स असून तिचे चित्रपट तिथे आवर्जून पाहिले जातात…(Entertainemnt Tadaka)

================================
हे देखील वाचा : Tabu And Baghban Movie : बिग बींसोबतचा चित्रपट तब्बूने का नाकारला?
=================================
तब्बूच्या चित्रपट कारकिर्दिबद्दल बोलायचं झालं तर, ‘मीनाक्सी’, ‘जाल’, ‘मिसिंग’, ‘अंधाधुंद’, ‘दे दे प्यार दे’, ‘गोलमाल अगेन’, ‘हाऊस ऑफ स्पाईस’, ‘हेरा फेरी’, ‘वीरासत’, ‘चाची ४२०’, ‘कालापानी’ अशा बऱ्याच चित्रपटांत तिने विविधांगी भूमिका साकारुन तिचा चाहता वर्ग निर्माण केला आहे…(Tabu Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi