Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

‘चला हवा येऊ द्या’च्या निवेदनावर पहिल्यांदाच व्यक्त झाला Abhijeet Khandkekar; म्हणाला ”झी आणि माझं नातं…”
झी मराठीवरील सुपरहिट विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेली १० वर्षं घराघरांत हास्याची उधळण करणारा हा नॉन-फिक्शन शो यंदा नव्या रुपात, नव्या सूत्रसंचालकासह परततोय. २६ जुलैपासून, दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता, ‘चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गँगवॉर’ हे नवीन पर्व प्रेक्षकांसमोर येणार आहे.(Abhijeet Khandkekar)

या सीझनमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे, डॉ. निलेश साबळेच्या जागी अभिनेता अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालक म्हणून दिसणार आहे. अभिजीतने याआधी झी मराठीवर गाजलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनयापासून सुरुवात करून आता तो निवेदनाच्या भूमिकेत येतो आहे. आणि ती जबाबदारीही तो मोठ्या आत्मविश्वासाने स्वीकारतो आहे. अभिजीत म्हणतो, “झी मराठीसोबतचं माझं नातं ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमापासून सुरू झालं. आता ‘चला हवा येऊ द्या’सारख्या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी निवड झाल्याचा मला आनंद आहे. गेल्या १० वर्षांत या कार्यक्रमाने हास्याची एक खास जागा निर्माण केली आहे आणि आता ती परंपरा मी पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे.”

या पर्वात महाराष्ट्रभरातून निवडलेले नवे विनोदवीर स्पर्धक सहभागी होणार आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, प्रियदर्शन जाधव, गौरव मोरे आणि भारत गणेशपुरे हे लोकप्रिय हास्यकलाकार ‘मेंटॉर’ म्हणून सोबत असणार आहेत. यामध्ये गटांमध्ये स्पर्धा असणार असून, हास्याची धमाल तर होणारच, पण त्यासोबतच नव्या कलाकारांना मंच मिळणार आहे.(Abhijeet Khandkekar)
==========================
==========================
प्रेक्षकांसाठी ‘चला हवा येऊ द्या’ हा एक आनंदसोहळा ठरला आहे. अभिजीतच्या रूपात नवीन उत्साह, नव्या शैलीत सादरीकरण आणि नव्या कलाकारांची हास्यमैफल यामुळे हे पर्व अधिक रंगतदार ठरणार, यात शंका नाही. अभिजीतने प्रेक्षकांना आश्वासन दिलं आहे की, “या नव्या पर्वातही प्रेक्षकांना तेवढीच हास्य, ऊर्जा आणि मजा अनुभवता येईल.”