
Renuka Shahane : “२-३ जणांना मारहाण करुन भाषा….”; महाठी-हिंदी भाषेवर शहाणेंची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात सुरु असलेल्या मराठी-हिंदी भाषा वादावर अनेक सेलिब्रिटी आपली मतं मांडताना दिसत आहेत… आता या प्रकरणी अभिनेत्री रेणूका शहाणे (Renuka Shahane) यांनी प्रतिक्रिया दिली असून, “ज्यांना मराठी बोलता येत नाही अशा २-३ जणांना मारुन भाषेला मत होणार नाही आहे”, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं आहे… काय म्हणाल्या आहेत रेणुका शहाणे जाणून घेऊयात….

तर, पुजा चौधरी यांच्या पॉडकास्टमध्ये रेणुका शहाणे यांनी सध्याच्या मराठी-हिंदी भाषा वादावर आपलं ठाम मंत मांडलं आहे… रेणुका म्हणाल्या की, ज्यावेळी एखाद्या शहरात किंवा ठिकाणी तुम्ही बराच काळ राहता तेव्हा तेथील भाषा, त्यांची संस्कृती ही आपल्याला समजली पाहिजे… महत्वाचं म्हणजे त्यांच्या भाषेचा, संस्कृतीचा आपण आदर केला पाहिजे… पण, ज्यावेळी काही लोकं एखाद्या शहरात राहूनही तिथल्या भाषेची गरज समजत नाही आणि आत्मसात करण्यास नकार देतात हे मला पटत नाही”.
================================
=================================
पुढे रेणुका म्हणाल्या की, “मला हिंसातार अजिबात आवडत नाही. म्हणजे काही जणं अशा भागात जातात जिथे मराठी बोलली जात नाही आणि ज्यांना मराठी बोलता येत नाही त्या २-३ जणांना मारहाण करुन मुळात भाषा जपण्यासाठी याचा काहीच उपयोग होणार नाही आहे”.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रेणुका शहाणे यांचे पती आशुतोष राणा यांनी देखील मराठी-हिंदी भाषेवर आपली प्रतिक्रिया दिली होती… ते म्हणाले होते की,”माझ्या मुलांची भाषा ही मराठी आहे. शिवाय माझ्या पत्नीचीही मातृभाषा मराठीच आहे. माझं वैयक्तिक असं मत आहे की, भाषा हा संवादाचा विषय आहे. भाषा कधीही वादाचा विषय नसते. भारत हा एक महान देश आहे. जिथे सर्व गोष्टींचा स्वीकार करण्यात आला आहे आणि या देशात संवादावर विश्वास ठेवला जातो. भारत वादावर विश्वास ठेवणारा देश नाही.”
================================
हे देखील वाचा : Jaideep Ahlawat : “‘नटसम्राट’ हिंदीत करण्याची इच्छा”
=================================
दरम्यान, रेणुका शहाणे यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर नुकत्याच त्या महेश मांजरेकर यांच्यासोबत ‘देवमाणूस’ चित्रपटात झळकल्या होत्या… तसेच, आत्तापर्यंत ‘हम आपके है कौन?’, ‘दिल ने जिसे अपना कहा’, ‘अबोली,’ ‘सुन जरा’, ‘हाच सुनबाईचा भाऊ’, ‘हायवे’, ‘तिरभांगा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi