
‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’मध्ये दिसणार Subodh Bhave चा लव्ह ट्रायअॅंगल
मराठी चित्रपट मेकर्स सातत्याने नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत… मराठी मातीतील गोष्टी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर मांडल्या जात असताना आता प्रेमाची एक हटके गोष्ट लवकरच आपल्यासमोर येणार आहे… सुबोध भावे, प्रार्थना बेहरे आणि रिंकु राजगुरु यांच्या प्रमुख भूमिका असणारा ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार असून पहिल्यांदाच हे तीन कलाकार एकत्रित स्क्रिन शेअर करणार आहेत…

हास्याने भरलेली, धमाल प्रसंगांनी नटलेली आणि नात्यांच्या गुंतागुंतीवर भाष्य करणारी एक हटके प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ हा चित्रपट एक मजेशीर लव्ह ट्रायंगल घेऊन येत आहेच. ज्यात नात्यांमधील गैरसमज, गोंधळ त्यातून उगम पावणारे हास्य यांचा सुरेख मिलाप पाहायला मिळणार आहे… या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय अमर यांनी केलं असून निर्मिती रजत अग्रवाल यांची आहे…
================================
हे देखील वाचा : Jaideep Ahlawat : “‘नटसम्राट’ हिंदीत करण्याची इच्छा”
=================================
दरम्यान, ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटात या ३ भन्नाट कलाकारांसोबत अनिकेत विश्वासराव देखील दिसणार आहे… प्रेमाची आणि त्यातही तिघांची ही लव्हस्टोरी २२ ऑगस्ट २०२५ पासून चित्रपटगृहात दाखल होणार आहे.. तसेच, सुबोध भावे याचा संत तुकाराम हा हिंदी चित्रपटही प्रदर्शित झाला असून यात सुबोधने संत तुकाराम यांची भूमिका साकारली आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi