Naseeruddin Shah : पहिल्या चित्रपटात नसीरुद्दीन यांना केवळ ७ रुपये होतं मानधन?
बॉलिवूडमधील एक अष्टपैलु अभिनेते म्हणजे नसीरुद्दीन शाह….१९७५ मध्ये श्याम बेनेगल यांच्या ‘निशांत’ चित्रपटातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली होती…’बाजार’, ‘हम पांच’, ‘गुलामी’, ‘चमत्कार’, ‘सरफरोश’, ‘इक्बाल’,’फिराक’ अशा अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत… १९७५ मध्ये जरी हिरो म्हणून त्यांनी कारकिर्द सुरु केली असली तरी १९६७ मध्ये अमन चित्रपटातून त्यांनी छोटेखानी भूमिका साकारत अभिनयाचा प्रवास सुरु केला होता…आज लाखो-करोडो रुपये एका चित्रपटासाठी घेणाऱ्या शाह यांना पहिल्या चित्रपटासाठी किती मानधन दिलं होतं माहित आहे का?

तर, नसीरुद्दीन शाह यांनी ज्यावेळी १९६७ साली ‘अमन’ चित्रपटातून सुरुवात केली होती त्यावेळी चित्रपटात काम करण्याचे त्यांना ७.५० रुपये मिळाले होते…त्यावेळी शाह केवळ १६ वर्षांचे होते… अमन चित्रपटात राजेंद्र कुमार प्रमुख भूमिकेत होते.. दरम्यान, लहानपणापासूनच शाह यांना अभिनयाची आवड होती… १४ व्या वर्षी शाळेत असताना शाह नाटकांमध्ये कामं करायचे.. पण नाटकाच्या वेडात एकदा शाह नापास झाले आणि वडिलांनी शाळाच बदलली… मात्र, शाह यांची अभिनयाची आवड काही कमी झाली नाही… शाह यांचं अॅडमिशन वडिलांनी दुसऱ्या शाळेत केलं… तिथे शाह यांनी मर्चंट ऑफ व्हेनिसचा शो केला. आणि त्यावेळी आय़ुष्यात पुढे अभिनयातच करिअर करायचा त्यांनी निर्णय घेतला… शाळा बदलली आणि नसीरुद्दीन यांचे मार्क्सही अचानक चांगले येऊ लागले… आणि शाळेत अभिनयातोबतच क्रिकेट संघातही शाह सामिल झाले…
================================
हे देखील वाचा : Priyanka Chopra : ‘बर्फी’तील झिलमिल ५ दिवसांत कशी घडली?
=================================
पुढे कालांतराने, १९७७ मध्ये नसीरुद्दीन शाह यांनी त्यांचे मित्र बेंजामिन गिलानी आणि टॉम अल्टर यांच्यासमवेत मोटेले प्रॉडक्शन नावाचा एक थिएटर ग्रुप स्थापन केला, ज्याच्या बॅनरखाली सॅम्युअल बेकेट दिग्दर्शित ‘वेटिंग फॉर गोडोट’ हे पहिले नाटक पृथ्वी थिएटरमध्ये प्रेक्षकांना दाखवण्यात आले. १९७९ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्पर्श’ या चित्रपटात नसीरुद्दीन शाह यांच्या अभिनयाचा नवा आयाम प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या चित्रपटात अंध व्यक्तीची भूमिका करणे हे कोणत्याही अभिनेत्यासाठी मोठे आव्हान होते.१९८० साली प्रदर्शित झालेला ‘आक्रोश’ हा नसीरुद्दीन शाह यांच्या चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा चित्रपट आहे. पुढे, १९८३ मध्ये नसीरुद्दीन शाह यांना सई परांजपे यांच्या कथा या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती…आजवर १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारणाऱ्या नसीरुद्दीन शाह यांनी ‘न्यूड’ आणि ‘देऊळ’ या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi