
“स्मिता तळवलकर यांनी ‘त्या’ गोष्टीमुळे मला मालिकेतून काढून टाकल,पण नंतर…” Tushar Dalvi यांनी सांगितला किस्सा!
मराठी टेलिव्हिजनच्या जगतातील एक संयमी, हळवा आणि दर्जेदार अभिनेता म्हणजे तुषार दळवी. सध्या ते ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत श्रीनिवास ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. त्यांच्या अभिनयातील सच्चेपणा आणि सहजता प्रेक्षकांच्या मनाला भिडते. या पार्श्वभूमीवर त्यांनी एक जुनं, पण खूप हृदयस्पर्शी किस्सा शेअर केला आहे, जो त्यांच्या आणि दिवंगत निर्मात्या-दिग्दर्शिका स्मिता तळवलकर यांच्यात घडला होता.( Actor Tushar Dalvi)

तुषार सांगतात की, “स्मिता तळवलकर या माझ्या फार जवळच्या होत्या. पण एकदा आमचं खूप बिनसलं होतं.” आमची ‘राऊ’ नावाची एक मालिका करताना वेळेच्या गोंधळामुळे मी दुसऱ्या शूटमध्ये अडकून राहिलो. त्यामुळे स्मिता तळवलकर यांना वाटलं की तुषार वेळेच्या बाबतीत सिरीयस नाहीत. त्या माझ्यावर नाराज झाल्या. इतक्या की त्यांनी मला त्या मालिकेतूनच काढून टाकलं. पुढे तुषार म्हणतात, “तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. कारण त्यांनी मला कुठलीही स्पष्टीकरणाची संधी दिली नव्हती. पण मी गप्प राहिलो. त्यांच्या निर्णयाचा आदर केला. राग नव्हता, फक्त खंत नक्कीच होती.”

पण याच नात्याला पुढे एक सुंदर वळण मिळालं. काही महिन्यांनी स्मिता तळवलकर यांनी तुषार दळवींना पुन्हा एक नवीन मालिकेसाठी बोलावलं. ‘बाजीराव पेशवा’ त्या सीरियलचं नाव होत . त्या वेळी त्यांनी जुन्या गोष्टीचा काहीही उल्लेख केला नाही. तुषार म्हणतात, “त्यांनी पुन्हा माझ्यावर विश्वास टाकला. ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती.” या सगळ्या अनुभवातून तुषार यांनी एक गोष्ट शिकली, “व्यवसायात मतभेद होणं साहजिक आहे. पण माणूस म्हणून त्या नात्याला सांभाळणं, पुन्हा विश्वास दाखवणं, हे फार थोड्या लोकांना जमतं. स्मिता तळवलकर त्यापैकीच एक होत्या.” अस ते आवर्जून सांगतात.(Actor Tushar Dalvi)
=================================
=================================
आज स्मिता तळवलकर आपल्यात नाहीत, पण तुषार यांच्या मनात त्यांच्याबद्दलची कृतज्ञता अजूनही तशीच आहे. त्या एक उत्तम निर्मात्या, सशक्त बाई आणि माणूस म्हणून दिलखुलास होत्या. मराठी सिनेसृष्टीला त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे. तुषारच्या शब्दांतून त्यांचं मोठेपण स्पष्ट दिसून येतं. खरतर तुषार यांनी सांगितलेला हा किस्सा फक्त एक आठवण नाही, तर तो मराठी इंडस्ट्रीतील एक शिकवण आहे. की क्षणिक राग, गैरसमज किंवा अडथळे आले तरी नातं तुटू नये. विश्वास ठेवल्यास, तो संबंध पुन्हा फुलतो…आणि त्यातूनच खरं माणूसपण समोर येतं.