Pushkar Shrotri च्या “श्श… घाबरायचं नाही” नाटकातून रत्नाकर मतकरींच्या गूढ कथा

Dadasaheb Phalke यांच्या आधीही मराठी माणसाने चित्रपट तयार केला होता!
आपल्या सर्वांनाच माहित आहे की, दादासाहेब फाळके (dadasaheb Phalke) यांना फादर ऑफ इंडियन सिनेमा म्हटलं जातं. पण त्यांच्या आधीही एका भारतीयाने चित्रपट तयार केला होता आणि खास गोष्ट म्हणजे तेसुद्धा मराठीच होते. तर ३ मे १९१३ रोजी भारताचा पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ रिलीज झाला होता. पण अनेकांना ही गोष्ट माहित नसेल की, त्याच्याच एक वर्षापूर्वी १८ मे १९१२ रोजी ‘श्री पुंडलिक’ हा चित्रपट रिलीज झाला होता आणि हा चित्रपट तयार केला होता दादासाहेब तोरणे यांनी… हा भारताचा सर्वात पहिला चित्रपट म्हणजेच फीचर चित्रपट होता. (Marathi Movies)

आता मात्र, तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की मग त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक का म्हटलं गेलं नाही. तर तोरणे यांचा ‘श्री पुंडलिक’ हा चित्रपट लंडनमध्ये तयार करण्यात आला होता. याशिवाय याचा कॅमेरामॅनसुद्धा एक ब्रिटीश होता. तसेच हा चित्रपट एका मराठी नाटकाचा फोटो रेकॉर्डींग केलेला चित्रपट होता. त्यामुळेच याला भारताच्या पहिल्या चित्रपटाचा बहुमान मिळाला नाही. पण हे अगदी खर की त्यांनी चित्रपटांचा प्रयोग केला होता.
================================
हे देखील वाचा : Salman Khan याने २२ वर्षांपूर्वी आलेल्या ‘तेरे नाम’मधील ‘ही’ गोष्ट ठेवलीये जपून!
=================================
अजून एक खास गोष्ट माहित आहे का ? याच्याही १३ वर्ष आधी १८९९ साली एक फेमस फोटोग्राफर होते त्यांनी ‘द रेसलर्स’ या रेसलिंग match चं चित्रप्रदर्शन मुंबईच्या हँगिंग गार्डनमध्ये भरवलं होतं. ही भारताची पहिली डॉक्युमेंटरी फिल्म ठरली होती. आणि ते फोटोग्राफर होते हरीश्चंद्र भातवडेकर… तो ही होता एक मराठी माणूसच. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीच्या निर्माणात मराठी माणसांचे योगदान फार आहेत…
-सागर जाधव
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi