लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

भारतीय नाटककार पद्मश्री Ratan Thiyam यांचे निधन
सुप्रसिद्ध भारतीय नाटककार पद्मश्री रतन थियाम यांचे २३ जुलै २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे भारतीय नाट्यसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्राचीन भारतीय रंगभूमीचा ऐतिहासिक वारसा थियाम यांनी त्यांच्या नाट्य दिग्दर्शनातून अविरपतपणे पुढे सुरु ठेवला होता. भारतीय नाटकांच्या इतिहासात रतन थियम यांनी विविध नाटकं दिग्दर्शित करुन खऱ्या अर्थाने एक इतिहास घडवला होता.

दरम्यान, रतन थियाम यांनी केवळ नाटकांचे लिखाण आणि दिग्दर्शनच केले नाही तर त्यावरुन लोकांमध्ये विचारमंथनही घडवून आणलं. १९८७ ते १९८९ या काळात त्यांनी NSD मध्ये विविध नाटकं दिग्दर्शित केली. कलेचं शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अभ्यासक्रमात आजही थियाम यांची नाटकं समाविष्ट केली गेली आहेत.
================================
हे देखील वाचा : Dadasaheb Phalke यांच्या आधीही मराठी माणसाने चित्रपट तयार केला होता!
=================================
रतना थियाम यांनी ‘अंधायुग’, ‘चक्रव्यूह’, ‘कर्णभारम’, ‘ऋतूसंहारम’, ‘लेंगशोनी’ ही नाटकं खूप गाजली. रतन थियाम यांच्या निधनानंतर नाट्यसृष्टीतील दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली असून रंगभूमीवर नवनवीन प्रयोग करणारा दिग्गज नाटककार हरपल्याची भावना व्यक्त केली आहे…