Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian singer mukesh

    Mukesh यांनी गीतकार नक्ष लायलपुरी यांना गुमनाम जिंदगीतून कसे बाहेर काढले!

    vidhu vinod chopra and lal krishna advani

    राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत वाद का घातला होता?

    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Saiyaara Movie: अहान पांडेच्या चित्रपटाने रचला इतिहास! अवघ्या ६ दिवसांत

Ravi Kishan :  “मुंबईसाठी मराठा समाजासोबतचं भोजपुरी समाजानेही…”; मराठी-हिंदी वादावर

‘सचिन सोबत माझी कधीच मैत्री नव्हती’ Ashok Saraf सराफ यांनी

Ujjwal Nikam Biopic: उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकमध्ये ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झळकणार

Paaru Serial: अखेर पारु आणि आदित्य लग्नबंधनात अडकणार; मालिकेट येणार

Amol Palekar : “मी अस्सल मराठी आहे आणि…”; मराठी-हिंदी भाषा

जेव्हा Kishore Kumar यांनी होम प्रॉडक्शनच्या बाहेरच्या ‘या’ एकमेव चित्रपटाला

‘वो मराठी अ‍ॅक्टर जैसा नही करने का’ दिग्दर्शकाचा माज; Chhaya

“Ramayana चित्रपटाचा स्क्रिनप्ले ऐकला आणि मी…” आदिनाथ कोठारे याने सांगितला

Star Pravah च्या ‘मुरांबा’ मालिकेत येणार ७ वर्षांचा लीप; रमा-अक्षयच्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mumbai Local Movie Trailer: लोकलच्या गर्दीत सुरु झालेल्या हळुवार प्रेमची कहाणी सांगणाऱ्या ‘मुंबई लोकल’ चा ट्रेलर प्रदर्शित !

 Mumbai Local Movie Trailer: लोकलच्या गर्दीत सुरु झालेल्या हळुवार प्रेमची कहाणी सांगणाऱ्या ‘मुंबई लोकल’ चा ट्रेलर प्रदर्शित !
मिक्स मसाला

Mumbai Local Movie Trailer: लोकलच्या गर्दीत सुरु झालेल्या हळुवार प्रेमची कहाणी सांगणाऱ्या ‘मुंबई लोकल’ चा ट्रेलर प्रदर्शित !

by Team KalakrutiMedia 23/07/2025

मुंबईच्या धावपळीच्या जीवनात लोकल ही केवळ प्रवासाची सोय नसून, ती लाखो लोकांची जीवनवाहिनी आहे. हाच लोकलचा प्रवास आणि त्यात उमलणारी एक साधी, पण हृदयाला भिडणारी प्रेमकहाणी “मुंबई लोकल” या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता स्वप्निल जोशी यांच्या विशेष उपस्थितीत लाँच करण्यात आला असून, या ट्रेलरमधून एक नाजूक, भावनिक आणि रंजक प्रवासाची झलक पाहायला मिळते. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अभिजीत यांनी केलं असून बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, आनंदी एंटरटेनमेंट आणि स्प्लेंडिड प्रॉडक्शन्स या तीन बॅनर्सखाली या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. निर्माते निलेश राठी, प्राची राऊत, सचिन अग्रवाल आणि तन्वी माहेश्वरी यांनी चित्रपटाला भक्कम पाठबळ दिलं असून त्र्यंबक डागा सहनिर्माता म्हणून काम पाहत आहेत.(Mumbai Local Movie Trailer)

Mumbai Local Movie Trailer

या चित्रपटात प्रथमच एकत्र स्क्रीन शेअर करणारी फ्रेश जोडी प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर प्रमुख भूमिकेत दिसणार असून, त्यांचं एकमेकांना भेटणं, ओळख होणं आणि नातं फुलत जाणं हे सर्व “मुंबई लोकल“च्या प्रवासात घडतं. तो आयुष्यातली प्रत्येक लढाई हरलेला; ती सगळं गमावलेली. पण एका क्षणी त्यांच्या नजरा भिडतात आणि सुरू होतो एक नवा अध्याय. चित्रपटाचा ट्रेलर हळूहळू उलगडत जातो, अगदी त्यांच्या नात्याप्रमाणेच. दोघांच्या भेटीपासून सुरू होणारी ही गोष्ट कुठल्या वळणांवर जाईल, त्यांच्या आयुष्यात कोणते अडथळे येतील, हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्कंठावर्धक ठरणार आहे. अभिनयाच्या आघाडीवर केवळ फ्रेश जोडीच नाही तर मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी आणि स्मिता डोंगरे यांसारखे अनुभवी कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचं असून संकलन स्वप्निल जाधव यांनी केलं आहे. विनोद शिंदे यांनी क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून भूमिका बजावली आहे तर कलादिग्दर्शन डॉ. सुमित पाटील यांचं आहे.

Mumbai Local Movie Trailer

संगीताच्या बाबतीतही हा चित्रपट खूपच समृद्ध आहे. गाणी अभिजीत कुलकर्णी आणि अभिजीत यांनी लिहिली असून, संगीत दिग्दर्शन देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी आणि हर्षवर्धन वावरे यांनी केलं आहे. चित्रपटाच्या पार्श्वसंगीताची जबाबदारी समीर सप्तिसकर यांनी सांभाळली आहे. निकुंज मालपाणी यांनी असोसिएट प्रोड्यूसर म्हणून काम पाहिलं असून नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे यांचं आहे.(Mumbai Local Movie Trailer)

================================

हे देखील वाचा: Happy Birthday Milind Gunaji: ‘भटकंती’मधून अख्खा महाराष्ट्र जगाला दाखवणारा अवलिया ‘मिलिंद गुणाजी’!  

================================

“मुंबई लोकल” हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, एक सामान्य प्रवासातून फुललेली असामान्य प्रेमकहाणी पाहण्यासाठी आता प्रेक्षकांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही. ट्रेलर पाहूनच प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेली उत्सुकता पाहता, हा चित्रपट चित्रपटगृहात नक्कीच गर्दी खेचणार, यात शंका नाही.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhijit Chavhan Aniket Kelkar Celebrity Entertainment manmeet pem Marathi Movie Mumbai Local Movie Trailer prithvik pratap Sanjay Khapre Sanjay Kulkarni and Smita Dongre swapnil joshi vanita kharat
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.